बॉलीवूड अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘रुस्लान’मुळे चर्चेत आहे. २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आयुष ‘रुस्लान’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयुषची पत्नी आणि भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खान अनेकदा तिच्या लुक्समुळे ट्रोल झालीय. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका मुलाखतीत आयुषने अखेर या सगळ्यावर आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा… “मला रोज फोन करतायत”, केदार शिंदे करतात निलेश साबळेला दररोज फोन, म्हणाला…

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आयुष म्हणाला, “मी जेव्हा लग्न केलं तेव्हापासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बोललं जातंय. खूप जणांनी माझ्या अर्पिताच्या वजनाबाबत त्यांचं मत मांडलंय. आमच्या कुटुंबाजवळ असणाऱ्या लोकांना माहीत आहे की, ती दिवसभर अहिल आणि आयतबरोबर असते. या सगळ्या गोष्टींत तिला मदत करायला कोणी इतर व्यक्ती नाही आहे. तिनं स्वत: आमच्या दोन्ही मुलांना मोठं केलंय.”

आयुष पुढे म्हणाला, “तिला सामाजिकदृष्ट्या चांगलं बनण्यापेक्षा एक चांगली आई बनायचंय. ती आता कधीच जास्त पार्टीजला जात नाही. मूल होण्याअगोदर जी अर्पिता खूप पार्टीज करायची, ती आता बदलली आहे. तिला आता तिचा वेळ घरी तिच्या मुलांना द्यायचाय. ती नेहमी म्हणते, की दुसरं कोणी आपल्या मुलांना वाढवलं, तर त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील? ती जिथे जाईल तिथे दोघांना घेऊन जाते. मी आज इथे आहे. कारण- ती तिथे आमच्या मुलांना सांभाळतेय.”

हेही वाचा… भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”

“जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर राहायचं असतं, तेव्हा तुम्ही इतर सर्व गोष्टी विसरता. हे माझ्याबरोबरदेखील होतं. जेव्हा मी माझ्या मुलांबरोबर असतो तेव्हा माझे केस कसे आहेत किंवा मी कसा दिसतोय याचा विचार करीत नाही. कारण- तेव्हा आमचं पूर्ण लक्ष आमच्या मुलांकडे असतं.”

आयुष असंही म्हणाला, “अर्पिता या नकारात्मक कमेंट्सचा स्वत:वर परिणाम होऊ देत नाही. तिची वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. लोक तिच्या रंगाचीही चेष्टा करतात. ती म्हणते, मला लहानपणापासूनच लोक तू काळी आहेस, असं बोलतात. पण मला या गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही. तिच्या रंगाबद्दल बरेच लोक तिला आपापली मतं देत असतात आणि ती हे सगळं हसण्यावर नेते.”

हेही वाचा… ‘जवान’मधील ‘जिंदा बंदा’ गाण्यावर थिरकले सुपरस्टार मोहनलाल; शाहरुख खान म्हणाला, “मी तुमच्याइतकं जरी चांगलं…”

“तिचा जो रंग आहे, तो तिचा रंग आहे. तुम्हाला तिला नाही बघायचंय तर नका बघू. कोणी तुम्हाला अडवलंय का? कोणी तुम्हाला सांगितलंय का की, जबरदस्तीनं तिला बघा. मला असंही सांगतात की तू जिमला जातोस, तर तू तिला का नाही घेऊन जात. अरे तिचं मन. तिला जायचंय की नाही जायचंय ते ती ठरवेल.”

हेही वाचा… “एकापेक्षा एक नमुने…”, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील अभिनेत्रींचा कॉमेडी व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

दरम्यान, आयुष शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या आयुष त्याचा आगामी चित्रपट ‘रुस्लान’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. २६ एप्रिल रोजी ‘रुस्लान’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष शर्मासह सुश्री मिश्रा, विद्या मालवडे व जगपती बाबू हे कलाकारही दिसणार आहेत.