Aamir Khan confirmed dating friend Gauri Spratt : अभिनेता आमिर खानने प्रेमाची कबुली दिली आहे. ६० वर्षांचा आमिर रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याने स्वतःच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे. कोण आहे त्याची गर्लफ्रेंड, ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली आहे. आमिर दीड वर्षापासून तिला डेट करतोय. तिचं नाव गौरी असून ती आमिरची २५ वर्षांपासूनची मैत्रीण आहे.

कोण आहे आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी?

Who is Gauri Spratt :आमिर खान व गौरी एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करत आहेत. गौरी मूळची बेंगळुरूची आहे. ती सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. गौरीला एक मुलगा असून तो सहा वर्षांचा आहे. गौरी ही तमिळ व आयरिश आहे. तिचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. गौरीने आमिरचे ‘दंगल’ व ‘लगान’ हेच चित्रपट पाहिले आहेत. आमिरने प्रेमाची कबुली देताना गौरीबरोबर आनंदी असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा

आमिर खानने मुंबईत त्याच्या ६० व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान माध्यमांना ही माहिती दिली. आमिरने सांगितलं की तो गौरीला २५ वर्षांपासून ओळखतो आणि आता ते रिलेशनशिपमध्ये आहेत. आमिर खान त्याच्या या नव्या व तिसऱ्या नात्याबाबत खूप गंभीर असल्याची चर्चा आहे. आमिरने गौरीची ओळख सलमान खान, शाहरुख खान तसेच आपल्या कुटुंबाला करून दिली आहे, अशी माहितीही समोर आली आहे.

आमिर खानचा दोन वेळा झालाय घटस्फोट

६० वर्षांच्या आमिर खानचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. त्याने पहिलं लग्न रीना दत्ताशी केलं होतं. १९८६ साली आमिर व रीना यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. या जोडप्याला जुनैद खान व आयरा खान ही दोन अपत्ये आहेत. या दोघांचा घटस्फोट २००२ मध्ये झाला.

आमिर खानने दुसरे लग्न किरण रावशी २००५ मध्ये केले होते. दुसऱ्या लग्नापासून त्याला १२ वर्षांचा मुलगा आझाद आहे. आमिर व किरण यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. आता आमिर खानने त्याच्या ६० व्या वाढदिवशी त्याच्या नवीन गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aamir khan confirmed dating his friend gauri spratt hrc