शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट पाहून अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवान चित्रपटगृहात जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. हा चित्रपट पाहिल्यावर सर्वजण सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत आहेत. तर आता अल्लू अर्जुन देखील हा चित्रपट पाहून फिदा झाला आहे.

आणखी वाचा : ओटीटीवर शाहरुख खान व नयनताराचा ‘हा’ अंदाज येणार समोर? ‘जवान’मधून डिलीट केलेले सीन्स लीक

हा चित्रपट पाहिल्यावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे लिहिलं, “या शानदार ब्लॉकबस्टरसाठी जवानच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. जवानचे निर्माते, तंत्रज्ञ, क्रू आणि संपूर्ण कलाकारांचे अभिनंदन. शाहरुख खानच्या जबरदस्थ अवताराने आणि त्याच्या पलीकडेही त्याच्या स्वॅगने संपूर्ण देशाला मोहित केलं आहे. खरंच खूप आनंद झाला तुमच्यासाठी सर.”

https://x.com/alluarjun/status/1702183997282095489?t=aDdBnDSdsC7s4Ddj4iBA5g&s=08

हेही वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

पुढे त्याने लिहिलं, “विजय सेतुपती, तुम्ही नेहमीप्रमाणेच तुमच्या भूमिकेत चमकत आहात. दीपिका पदुकोणची मोहक, प्रभावी भूमिका… नयनतारा तर राष्ट्रीय स्तरावर चमकली. अनिरुद्ध, संपूर्ण देश तुझं संगीत पुन्हा पून्हा ऐकत आहे. अतिशय विचारपूर्वक व्यावसायिक चित्रपट देऊन भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्याबद्दल आणि आम्हा सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केल्याबद्दल ॲटली यांचं खूप खूप अभिनंदन.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor allu arjun gave his reaction after watch hing shahrukh khan starrer jawan rnv