गेले अनेक दिवस नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरची सर्वत्र चर्चा होती. तर नुकताच या कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या उद्घाटनाला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच स्टार्सनी हजेरी लावली होती. इतकच नाही तर त्यांनी उद्घाटन सोहळ्यामध्ये धमाकेदार परफॉर्मन्सही दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता शाहरुख खान या उद्घाटनाला त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांबरोबर उपस्थित होता. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानला अंबानी कुटुंबाच्या वतीने परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तर त्याच्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमात रंगत आणली. फक्त तोच नाही तर त्याला नाचताना पाहून वरुण धवन आणि रणवीर सिंगनेही त्याची साथ दिली.

आणखी वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

या उद्घाटन सोहळ्यातील शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख ‘झुमे जो पठाण’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तर आधी स्टेजवर त्याला पाहून टाळ्या वाजवणारा वरुण त्याच्याबरोबर नाचू लागला. तर त्या दोघांना नाचताना पाहून रणवीर सिंग ही स्टेजवर आला आणि थिरकू लागला. त्या तिघांना एकत्र नाचताना पाहून तिथे उपस्थित सर्वजण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवू लागले.

हेही वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. तसंच वयाच्या ५७ व्या वर्षी त्याची असलेली एनर्जी पाहून सर्वचजण अवाक् झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor shahrukh khan dances with ranveer singh and varun dhawan at neeta ambani event rnv