बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी मिली या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच जान्हवीने एका मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा याच्याबद्दल भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवीने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. “कलाविश्वातील कोणत्या तीन अभिनेत्यांना तुझ्या स्वयंवरमध्ये बघायला आवडेल?”, असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला. यावर उत्तर देत जान्हवीने “हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि रणबीर कपूर”, या अभिनेत्यांची नावे घेतली. परंतु, रणबीर कपूरचं लग्न झालं असल्याचं लक्षात येताच “रणबीरचं लग्न झालं आहे”, असं ती म्हणाली. नंतर जान्हवी म्हणाली, “सगळेच विवाहबंधनात अडकले आहेत”.

हेही वाचा >> Video : सैफ अली खानची पॅण्ट खाली खेचत होता तैमूर अन्…; एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

जान्हवीच्या स्वयंवरसाठी तिला मुलाखतीत दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाचं नाव सजेस्ट करण्यात आलं. यावर जान्हवीने “व्यावहारीकदृष्ट्या त्याचं लग्न झालं आहे”, असं उत्तर दिलं. नुकतंच जान्हवीला तिचा एक्स बॉयफ्रेण्ड शिखर पहारियासह स्पॉट करण्यात आलं होतं.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

दरम्यान विजय देवराकोंडा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत विजयने यावर स्पष्टीकरण दिलं होतं. “लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे तुमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतात. तुमच्या जीवनात काय चाललंय हे जाणून घ्यायला त्यांना आवडतं. अशा चर्चांमुळे मला काहीही फरक पडत नाही”, असं तो म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress janhvi kapoor said vijay deverakonda is practically married kak