प्रभास आणि क्रिती सेनन हे स्टार असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. दिल्ली आणि मुंबईत ‘आदिपुरुष’ची तिकिटे दोन हजार रुपयांपर्यंत विकली जात आहेत. ५०० कोटी रुपयांमध्ये बनवलेला हा चित्रपट उद्या (१६ जूनला) प्रदर्शित होणार आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाला आहे. अशा स्थितीत ‘आदिपुरुष’च्या बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- खात्रीने सांगतो…”; मनोज बाजपेयी यांचे राजकारणातील प्रवेशाबाबत मोठे विधान!

प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ खूप गाजत असून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट ४० ते ५० कोटींची कमाई करेल असे सांगण्यात येत आहे. हिंदी भाषेमध्ये किमान ४ हजार स्क्रीन्सवर आणि सर्व भाषांमध्ये ६ हजार २०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा सिनेमा 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

प्रदर्शनाच्या ५० दिवसांनंतर ‘आदिपुरुष’ला ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘आदिपुरुष’ OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. यासाठी निर्मात्यांनी २५० कोटींचा करारही केला आहे. प्रदर्शनापूर्वीच ‘आदिपुरुष’ने संगीत, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल अधिकार विकून तब्बल ४३२ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा- “दीपिका ही रणवीरच्या मांडीवर बसलेली आणि…,” गुलशन देवय्याचा स्टार कपलच्या लव्हस्टोरीबाबत मोठा खुलासा!

‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush box office collection prediction may open at 40 to 50 crore day dpj