Aishwarya Rai Bachchan Bodyguard Salary: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ऐश्वर्या जगभरातील अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असते. बरेचदा तिच्याबरोबर तिची मुलगी आराध्या देखील असते. ऐश्वर्या व आराध्या यांच्या सुरक्षेसाठी सावलीप्रमाणे त्यांचा बॉडीगार्ड असतो. या बॉडीगार्डला ऐश्वर्या राय किती पगार देते ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचे नाव शिवराज आहे. शिवराज सध्या बच्चन कुटुंबासाठी काम करत आहे, तो ऐश्वर्या राय बच्चनला सुरक्षा पुरवतो. शिवराज ऐश्वर्याबरोबर प्रत्येक इव्हेंटला जातो. तो टेक्निकल एक्सपर्ट आहे. ऐश्वर्या जिथे जाईल तिथे शिवराज तिच्याबरोबर असतो. तो बऱ्याच वर्षांपासून बच्चन कुटुंबासाठी काम करतोय. अमिताभ बच्चन व बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी वेगळे बॉडीगार्ड आहेत.

हेही वाचा – Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणच्या नावाने लुबाडणूक; प्रकरण उघडकीस आल्यावर चाहत्यांना स्वत: केली विनंती, म्हणाला…

सेलिब्रिटी हे पब्लिक फिगर असतात, त्यामुळे मात्र त्यांची सुरक्षा आणि गोपनियता याची त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. सेलिब्रिटी सामान्य लोकांप्रमाणे फिरू शकत नाहीत. आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये तिची इतकी क्रेझ आहे की तिच्याबरोबर एक सेल्फी मिळावा यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे ऐश्वर्या जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिच्याबरोबर बॉडीगार्ड असतात. शिवराज हा बऱ्याच काळापासून ऐश्वर्यासाठी काम करत आहे. शिवराजचा एका वर्षाचा पगार एक कोटींहून जास्त असल्याचं वृत्त इंडिया डॉट कॉमने दिलं आहे.

हेही वाचा – “माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सुरक्षेसाठी खूप पैसे खर्च करतात. ऐश्वर्याप्रमाणेच अनुष्का शर्माबरोबरही कायम तिचा बॉडीगार्ड असतो. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या बॉडीगार्डचं नाव प्रकाश सिंह उर्फ ​​सोनू आहे. ‘झूम’च्या वृत्तानुसार, सोनूला अनुष्का व विराटच्या संरक्षणासाठी १.२ कोटी रुपये वार्षिक पगार दिला जातो. सेलिब्रिटींची बॉडीगार्ड्सचा पगार अनके कंपन्यांच्या सीईओंपेक्षा जास्त असतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan bodyguard salary details hrc