Akshay Kumar cheated on Shilpa Shetty: धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला २००० साली प्रदर्शित झालेला ‘धडकन’ चित्रपट चांगलाच गाजला होता. त्या चित्रपटातील गाणी, कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे या चित्रपटाचे कौतुक झाले होते. आता या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘धडकन’ या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी व शिल्पा शेट्टी यांच्यातील नातेसंबंध, प्रेम आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचा ते कसा सामना करतात, हे पाहायला मिळते. सुनील शेट्टीचा ‘अंजली तुम सिर्फ मेरी हो’ हा डायलॉगही चांगलाच गाजला. चित्रपटातील ‘अक्सर इस दुनिया में’, ‘दिल ने ये कहा है दिल से’ ही गाणी आजही ऐकली जातात. या चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ तीन वर्षे चालू होते.
काही दिवसांपूर्वीच शिल्पा व अक्षय एकमेकांना एका कार्यक्रमात भेटताना दिसले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचे कारण म्हणजे २५ वर्षांपूर्वी अक्षय व शिल्पा यांचे ब्रेकअप झाले होते. ‘धडकन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शिल्पा शेट्टी व अक्षय कुमार यांचे ब्रेकअप झाले होते.
या चित्रपटाच्या आधी ते एकमेकांना खूप वर्षांपासून डेट करत होते. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, त्यांच्यात गैरसमज झाले. ब्रेकअपनंतर शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर मोठे आरोप केले होते. अक्षय कुमारने फसवणूक केल्याचेदेखील तिने म्हटले होते.
२००० साली Indya.com दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शेट्टी म्हणालेली, “मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले; पण मला त्याने फसवले. जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता आणि तुम्हाला तो फसवतो, त्यावेळी खूप दु:ख होते. मी कधीच कल्पना केली नव्हती की, आम्ही रिलेशनशिपमध्ये असताना तो दुसऱ्या एखाद्या मुलीला डेट करेल.”
असे म्हटले जाते की जेव्हा अक्षय कुमार शिल्पा शेट्टीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, त्यावेळी तो ट्विंकल खन्नाला डेट करत होता. शिल्पा शेट्टी त्यावेळी म्हणालेली की, धडकन हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी शांत बसले होते. तसेच, यासाठी इतर कोणत्याही महिलेला जबाबदार धरणे योग्य नसल्याचेदेखील म्हटले होते. अभिनेत्री म्हणालेली, “जर माझाचा बॉयफ्रेंड मला फसवत असेल, तर इतर कोणत्या महिलेला दोष देऊन काय उपयोग आहे? या सगळ्यात पूर्णत: त्याची चूक आहे. अक्षय कुमारने माझा वापर केला आणि त्याला इतर कोणी मिळाल्यावर, त्याने मला सोडून दिले. मी त्याच्यावर नाराज आहे; इतर कोणावर नाही”, असे शिल्पाने म्हटले आहे.
याचदरम्यान, अक्षय कुमारने सुभाष के झा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, “हो आम्ही ब्रेकअप केले आहे. ब्रेकअप होत असतात, हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. मला वाटते की, तिने तिच्या आयुष्यात पुढे जावे आणि मलाही जाऊ द्यावे. आता आम्ही वेगळो झालो आहोत. तिने माझ्यावर आरोप करणे थांबवले पाहिजे. तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी तिची दिशाभूल केली आहे. ती ज्या पद्धतीने बोलत आहे, वक्तव्ये करत आहे, ते मला आवडत नाही. तिच्या खूप कटुता आली आहे. माझा हा सल्ला आहे की, तिने तिच्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे.
चित्रपटाच्या शूटिंगसाठी तीन वर्षांचा कालावधी का लागला? यावर दिग्दर्शक धर्मेश दर्शन म्हणालेले, “धडकन चित्रपटाच्या शूटिंगआधी मी आमिर खानची प्रमुख असलेल्या मेला या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो.” मात्र, अक्षय आणि शिल्पा यांच्यातील वाढत्या समस्यांमुळे शूटिंगमध्ये दिरंगाई झाल्याचे म्हटले जात होते.
‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी व अक्षय कुमार यांच्याबाबत धर्मेश दर्शन म्हणालेले, “मोहरा’मध्ये काम करताना अक्षय आणि सुनील यांच्यात मोठी समस्या निर्माण झाली. तरीही मी सुनील शेट्टीवर अवलंबून होतो. मी त्याला देव म्हणून पाहिले.”