अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्याबरोबरचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. २५ सप्टेंबरला अक्षयची मुलगी निताराचा ११ वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त लाडक्या लेकीला शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न २’ केव्हा येणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर महाजनी म्हणाला…

अक्षय कुमारने निताराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरचा खास व्हिडीओ शेअर केला होता. या पोस्टमध्ये अभिनेता लिहितो, “आपल्या मुली एवढ्या लवकर का मोठ्या होतात? हे मला कळत नाही. माझी लेक काही वर्षांपूर्वी माझा हात पकडून चालायला शिकली ती येत्या काही दिवसात मोठी होणार आहे. तिला संपूर्ण जग जिंकायचंय. मला तुझा आणि तुझ्यात असलेल्या कलागुणांचा खूप अभिमान वाटतो नितारा.”

हेही वाचा : हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून भारवले होते जॉनी लिवर, सेटवर नम्रता संभेरावला दिलेलं महागडं गिफ्ट; म्हणाली, “सोन्याचं…”

अक्षय पुढे लिहितो, “इतर मुलांना डिस्नेलॅंड पाहायला आवडतं पण, तुला स्वत:चं डिस्नेलॅंड बनवायचंय. तू अवकाशात उंच भरारी घेत राहा…मी आणि तुझी आई कायम तुझ्या पाठिशी आहोत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिन्सेस!”

हेही वाचा : “हिला स्वतःची पोरं सांभाळता आली नाहीत आणि…”, ‘आई कुठे काय करते’च्या ट्रॅकमुळे प्रेक्षक हैराण, नाराजी व्यक्त करत म्हणाले…

दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सुद्धा नितारासह एक गोड व्हिडीओ करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अक्षय आणि ट्विंकलने १७ जानेवारी २००१ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २००२ मध्ये आरवचा आणि २०१२ मध्ये निताराचा जन्म झाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar pens emotional note on daughter nitaras birthday sva 00