scorecardresearch

Premium

‘मुळशी पॅटर्न २’ केव्हा येणार? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत गश्मीर महाजनी म्हणाला…

सोशल मीडियावर गश्मीर महाजनीने दिली चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं…

gashmeer mahajani on mulshi pattern
गश्मीर महाजनी आणि प्रवीण तरडे

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. व्यवसाय करण्यासाठी जमिनी विकलेल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होते याचं वास्तव ‘मुळशी पॅटर्न’मध्ये दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. अगदी बॉलीवूडमध्येही या चित्रपटाचा ‘अंतिम’ असा रिमेक बनवण्यात आला होता.

हेही वाचा : हास्यजत्रेतील ‘ते’ स्किट पाहून भारवले होते जॉनी लिवर, सेटवर नम्रता संभेरावला दिलेलं महागडं गिफ्ट; म्हणाली, “सोन्याचं…”

abhinay berde first look test for boyz 4
“‘बॉईज ४’च्या ट्रेलरमध्ये तुझे सीन्स कट का केलेत?” चाहत्याच्या प्रश्नावर अभिनय बेर्डे म्हणाला, “त्यांनी असं…”
sai tamhankar
“…मग घर कसं होईल?” कुटुंबियांबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सई ताम्हणकरच्या उत्तराने वेधलं लक्ष
gashmeer mahajani replies to his fans questions
“स्वामींबद्दल काय सांगशील?”, चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी म्हणाला, “त्यांच्या आशीर्वादाने…”
shahrukh khan hilarious replies to his fan
“‘मन्नत’मध्ये पाली आहेत का?”, चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला…

आजही ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळे प्रवीण तरडेंचे चाहते त्यांच्याकडे सतत लवकरात लवकर मुळशी पॅटर्न चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करा अशी मागणी करत होते. मध्यंतरी या लोकप्रिय दिग्दर्शकाने ‘धर्मवीर २’च्या नंतर ‘मुळशी पॅटर्न २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न २’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा : Video: करण कुंद्राने नव्या घरात केला गृहप्रवेश; पाहा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घराची पहिली झलक

दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि अभिनेता गश्मीर महाजनी हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. गश्मीर इन्स्टाग्रामवर दर रविवारी ‘आस्क गॅश’ सेशन घेत असतो. या सेशनमध्ये गश्मीरने अनेकदा माझे आवडते दिग्दर्शक प्रवीण तरडे आहेत असं सांगितलं आहे. म्हणूनच नुकत्याच घेतलेल्या एका सेशनमध्ये एका चाहत्याने अभिनेत्याला ‘मुळशी पॅटर्न’बद्दल प्रश्न विचारला. “मुळशी पॅटर्न २ वर काही अपडेट?”, चाहत्याच्या प्रश्नावर “हो चित्रपट येईल पण थोडा वेळ लागेल…संयम ठेवा”, असं उत्तर अभिनेत्याने दिलं आहे.

gashmeer mahajani
गश्मीर महाजनीने दिलं उत्तर

हेही वाचा : लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात ओम भुतकर, देवेंद्र गायकवाड, उपेंद्र लिमये, मालविका गायकवाड, रमेश परदेशी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor gashmeer mahajani answered on pravin tarade mulshi pattern 2 update sva 00

First published on: 26-09-2023 at 13:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×