Mahakali Movie Akshaye Khanna First Look : ‘महाकाली’ हा एक नवीन चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ त्याच्या कथेसाठीच खास नाही, तर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना याने या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘महाकाली’च्या बातमीने चित्रपटप्रेमींमध्ये आधीच उत्साह निर्माण झाला आहे.

हा चित्रपट प्रशांत वर्मा यांच्या प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स (पीव्हीसीयू)चा भाग आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक रिलीज केला आहे, ज्यामध्ये तो ‘महाकाली’मध्ये असुरगुरू शुक्राचार्यची भूमिका साकारणार असल्याचे उघड झाले आहे. अक्षयसाठी ही भूमिका पूर्णपणे नवीन आणि अनोखी असेल. गाजलेल्या ‘हनुमान’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या नव्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पोस्टरमध्ये अक्षयचा लूक आकर्षक आहे. प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘महाकाली’मधील अक्षय खन्नाचा हा पहिला लूक रिलीज केला आहे. शुक्राचार्य यांच्या भूमिकेत अक्षय खन्नाचा लूक अप्रतिम आहे. पांढरे कपडे, लांब दाढी व लांब पांढरे केस या लूकमध्ये अक्षय खन्ना जबरदस्त दिसतोय. ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर आता अक्षय खन्नाचा हा ‘शुक्राचार्य’ अवतार प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करीत आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांनी अक्षय खन्नाच्या लूकची तुलना अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्की’ लूकशीही केली.

अक्षय खन्नानं चित्रपटात गुरू शुक्राचार्यांची भूमिका साकारली आहे. शुक्राचार्यांच्या भूमिकेत त्याला ओळखणं कठीण आहे. अक्षय खन्नाचा लूक खरोखरच अदभुत आहे. ‘महाकाली’ चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या ‘महाकाली’मधील केवळ अक्षय खन्नाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे.

या चित्रपटात इतर कोणकोणते कलाकार असतील, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. फक्त अक्षयचा लूक समोर आला आहे. या लूकची नेटकऱ्यांकडून खूप प्रशंसा होतेय. अक्षयच्या या अनोख्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.

याआधी ‘छावा’ चित्रपटात अक्षयनं औरंगजेबाची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेतही त्याला ओळखणं कठीण झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयच्या करिअरमधील ही अत्यंत वेगळी भूमिका आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या या लूकची खूप चर्चा होत आहे.