Alia Bhatt and Kareena Kapoor pose together: दिवाळी या सणाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. सण-उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबीय-नातेवाईक, मित्र परिवार कामातून वेळ काढून एकत्र येतात. आनंद साजरा करतात. आता कलाकारदेखील दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर कलाकार फोटो शेअर करीत लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे.
कपूर कुटुंबाने धुमधडाक्यात दिवाळी साजरी केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबाचे सदस्य एकत्र आले होते. आलिया भट्टपासून ते करीना कपूरपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. करीनाने तिच्या निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते. सर्व पिढ्यांतील सदस्य यावेळी उपस्थित असल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहिलेत का?
आलिया भट्टने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये करीना कपूर, आलिया भट्ट, नीतू कपूर, करिश्मा कपूरसह इतर महिला दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये आलिया आणि करीना कपूर दिसत आहेत.
करीना कपूर खानने राजस्थानी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे; तर आलियाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे आणि त्यावर त्याच रंगाचे जॅकेट घातले आहे. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. पुढे आलियाने विविध पोजचे फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळीच्या सणाला संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
आता आलिया भट्टने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. करीनाचा पती सैफ अली खान आणि त्यांची मुले जेह व तैमूरदेखील या सेलिब्रेशनचा भाग होते. तसेच, सैफ अली खान व अमृता सिंहचा मुलगा इब्राहिमदेखील यामध्ये सहभागी झाला होता. करिश्मा कपूर ही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. तीदेखील या पार्टीत सहभागी झाली. तिच्या साध्या लूकने सर्वांची मने जिंकली.
याबरोबरच सोहा अली खान, रणधीर कपूर, बबिता कपूर, आधार जैन, आलेखा अडवाणी, अनिसा मल्होत्रा, अरमान जैनदेखील या उत्सवात सहभागी झाले होते. इब्राहिम अली खानने तैमूर व जेहबरोबरचे काही सुंदर फोटो शेअर केले. त्याच्या फोटोंवर अनेकांनी क्यूट, अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, इब्राहिम अली खानदेखील सध्या चित्रपटांत काम करीत आहे; मात्र अद्याप त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले गेले होते. आता आगामी काळात तो कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.