आज २८ मे रोजी भारताच्या नव्या संसद भवनाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा दिल्लीत संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. गेली अनेक दिवस हे नवं संसद भवन चर्चेत होतं. तर आता सर्वांचं लक्ष या उद्घाटन सोहळ्याकडे लागलं आहे. आता याबाबत सिनेसृष्टीतील अनेक आघाडीच्या कलाकारांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले काही दिवस या नवीन संसद भवनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून या संसद भवनाच्या रचनेबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या मनातली ही उत्सुकता व्यक्त करत नव्या संसद भवनाचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केले नवीन घर, ‘अशी’ आहे ही आलिशान मालमत्ता

अमिताभ बच्चन रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्लॉग लिहितात. तर काल त्यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून नवीन संसद भवनाबद्दल भाष्य केलं. त्यांनी लिहिलं, “आता देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. मी माजी खासदार असल्याने या विशेष प्रसंगी मी शुभेच्छा देतो. मला या नवीन संसद भवनाच्या रचनेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्याचा आकार, त्याची बांधणी अशी का केली आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे. तर याबरोबरच नवीन इमारतीचा पौराणिक, धर्मशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय अर्थ काय आहे, हेही मला जाणून घ्यायचं आहे.”

हेही वाचा : “…म्हणून बंगल्याचं नाव ‘प्रतीक्षा’ ठेवलं,” बिग बींनी केलं गुपित उघड

फक्त अमिताभ बच्चनच नाही तर शाहरुख खान, अक्षय कुमार, रजनीकांत, कमल हासन यांसारख्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan expressed his curiosity about new parliamentary building architecture rnv
First published on: 28-05-2023 at 12:21 IST