महानायक अमिताभ बच्चन यांची एक जाहिरात वादात अडकली आहे. व्यापार्‍यांची संघटना CAIT ने (Confederation of All India Traders) एका जाहिरातीविरोधात ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यामते ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. ही जाहिरात फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलशी संबंधित असून त्यात अमिताभ बच्चन आहेत. अमिताभ यांच्या एका संवादावर सीएआयटीने नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं बॉलीवूड पदार्पण, जान्हवी अन् साराशी कनेक्शन असलेला वीर आहे तरी कोण?

सीएआयटीने सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीकडे (CCPA) तक्रार केली आहे. त्यात ही जाहिरात दिशाभूल करणारी आणि देशातील छोट्या विक्रेत्यांविरुद्ध, दुकानदारांविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून ही जाहिरात मागे घेण्याचीही मागणी केली आहे. खोट्या किंवा दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार फ्लिपकार्टकडून दंड आकारण्यात यावा आणि बच्चन यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी सीएआयटीने केली आहे.

चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्रींनी केली भगवद्गीता व प्लेबॉयची तुलना; म्हणाले…

फ्लिपकार्टला ईमेल पाठवला होता, पण त्यांच्याकडून कोणतंही उत्तर मिळालं नाही आणि प्रतिक्रियेसाठी बच्चन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं सीएआयटीने म्हटलं आहे. “कलम २(४७) मधील व्याख्येनुसार फ्लिपकार्ट अमिताभ बच्चन यांच्यामार्फत ती जाहिरात देत आहेत. भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये विक्रेते/पुरवठादारांकडून मोबाईल फोन ज्या किमतीत विकले जात आहेत, त्याबाबत जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळे दुसर्‍या व्यक्तीच्या वस्तू, सेवा किंवा व्यापारावर परिणाम होतो,” असे सीएआयटीचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलं आहे.

“मराठी लोकांमध्ये हावरटपणा नव्हता”, जितेंद्र यांनी केलं कौतुक; म्हणाले, “तेव्हा लबाड…”

फ्लिपकार्टच्या ज्या जाहिरातीवरून वाद झाला आहे, त्यात अमिताभ बच्चन म्हणतात की बिग बिलियन डे सेलमध्ये फोन ज्या किमतीत मिळतील, त्या किमतीत ते कोणत्याच मोबाईल स्टोअरमध्ये ऑफलाइन मिळणार नाही. बिग बिलियन डेज सेल ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि दिशाभूल करणार्‍या जाहिराती, २०२२ च्या नियम ४ नुसार, फ्लिपकार्टची जाहिरात दिशाभूल करणारी आहे. कारण त्यात सत्य नाही. ती पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी आहे, असंही खंडेलवाल म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan flipkart ad in controversy cait called it biased misleading ask to remove hrc