Amitabh Bachchan scolded Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन अनेकदा सोशल मीडियावर त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनचं कौतुक करत असतात. कधी त्याने निवड केलेल्या चित्रपटाचं तर कधी त्यातील त्याच्या कामाचं. परंतु, एकदा मात्र अमिताभ बच्चन मुलगा अभिषेकवर खूप रागावले होते.
नामांकित शेफ हरपाल सिंग सोखी ज्यांचं हॉटेल व्यवसायात मोठं नाव आहे. जे टेलीव्हिजनवरही झळकले आहेत. त्यांनी मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत असतानाच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यावेळी त्यांनी अनेक सेलिब्रिटींना होस्ट केलं. अशातच आता त्यांनी अमिताभ बच्चन व माधुरी दीक्षित यांच्याबद्दल सांगितलं आहे.
‘या’ कारणामुळे अभिषेक बच्चनवर रागावलेले अमिताभ बच्चन
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जुहू येथील (Centaur Hotel)ला अनेक कलाकार भेट द्यायचे. माधुरी दीक्षितही अनेकदा तिथे जायची असं सांगितलं. पुढे ते म्हणाले, “मी तुम्हाला एक चांगला किस्सा सांगतो. आमचं एक इंडियन रेस्टॉरंट होतं आणि अमिताभ बच्चन तिथे यायचे. ते जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि त्यांच्या मुलीबरोबर यायचे. मला अजूनही आठवतं की तेव्हा अमिताभ बच्चन ताटातलं सगळं जेवण संपवायचे आणि जर त्यांच्या मुलाच्या अभिषेकच्या ताटात थोडं जरी अन्न शिल्लक राहिलं असेल तर ते त्याला सगळ्यांसमोर ओरडायचे.”
अमिताभ बच्चनबद्दल बोलताना शेफ हरपाल सिंग सोखी म्हणाले, “अमिताभ बच्चन अभिषेकला म्हणालेले, अभिषेक, तुझ्या ताटातलं सगळं जेवण संपव. त्यावर अभिषेक म्हणालेला, नाही माझं पोट भरलं आहे तेव्हा त्याचे वडील त्याला मग तू एवढं वाढून का घेतलंस असं म्हणाले होते.”
शेफ हरपाल सिंग सोखी यांनी पुढे श्रीदेवींबद्दल सांगितलं की, “श्रीदेवी हॉटेल मध्ये २ वर्षं राहत होत्या. त्यांची ठरलेली खोली होती. पण त्या हॉटेलमध्ये जेवायच्या नाही. त्यांच्यासाठी त्यांचा मॅनेजर एका प्रसिद्ध हॉटेलमधून जेवण आणायचा. ज्यामध्ये फिश करी वगैरे साऊथ इंडियन फूड असायचे. हॉटेलमधून त्या आमच्या हॉटेलमधून फक्त वरण भात मागवायच्या