७० च्या दशकात अमिताभ बच्चन यांना टक्कर देणारे त्यावेळी दोनच अभिनेते होते ते म्हणजे विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा. चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यातही डॅशिंग असणारे शत्रुघ्न सिन्हा हे कायम चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच त्यांनी राजकारणातही नशीब आजमावलं आहे. शिवाय ते त्यांचं मत परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच बॉयकॉट ट्रेंडवर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य केलं आहे. एकंदरच मीडिया आणि सोशल मीडिया यामधला फरक त्यांनी मांडला आहे. ते म्हणाले, “खासकरून कोविडनंतर सोशल मीडियाची ताकद प्रचंड वाढली आहे. पारंपरिक मीडिया हा आता बराच मागे पडला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मताला मिळणारं महत्त्व ठाऊक आहे. यामुळेच सोशल मीडियाची ताकद वाढली आहे.”

आणखी वाचा : शिव ठाकरे बड्या स्टारसह लवकरच झळकणार चित्रपटात; इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून दिलं सरप्राईज

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलर्सविषयी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “सोशल मीडियावर कोणीही काहीही बोलू किंवा लिहू शकतं आणि त्यांना आपण थांबवू शकत नाही. यासाठी सोशल मीडियावर काही खास लोकांची ट्रोलिंग सेना नेमण्यात आली आहे. या सगळ्याचा फटका बऱ्याचदा आम्हाला आणि आमच्या चित्रपटांना बसतो.” अशाप्रकारे बॉयकॉट ट्रेंडबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य केलं आहे.

गेल्यावर्षी खासकरून बॉलिवूड चित्रपटांना या बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सची चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटालादेखील या बॉयकॉटचा सामना करावा लागला. चित्रपटाभोवती बरेच वाद निर्माण झाले, पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जगभरात या चित्रपटाने ९८८ कोटी एवढी कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shatrughan sinha speaks about trolling and boycott trend on social media avn