सध्या काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. रस्त्याच्या कडेने, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर घेता येत नाही. अनेकांना तर अन्नही मिळत नाही. अशा गरजू लोकांना बॉलीवूड अभिनेत्रीने मदत केली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बॉलीवूड विद्या बालनचा (Vidya Balan Video) आहे. या व्हिडीओत विद्या गरजू लोकांना, लहान मुलांना कपडे व वडापावचे वाटप करताना दिसत आहे. कारमध्ये बसलेली विद्या गरजू लोकांना मदत करतानाचा व्हिडीओ फिल्मीज्ञान नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विद्याचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”

विद्याच्या या कृतीने चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत विद्याने दाखवलेल्या माणुसकीबद्दल तिचं कौतुक केलं. ‘माणुसकी अजुन जिवंत आहे’, ‘खूप चांगलं काम करतेय’, ‘या चांगल्या कामासाठी तुला सलाम’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

विद्याच्या व्हिडीओवरील कमेंट्स

विद्या बालनच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (सौजन्य – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – ममता कुलकर्णीची एका आठवड्यात किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, महामंडलेश्वर पददेखील गेलं, नेमकं काय घडलं?

दरम्यान, विद्या बालनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘भूल भुलैय्या 3’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, विजय राज हे कलाकार होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटाने ४०० कोटींहून जास्त कलेक्शन केले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

‘भूल भुलैय्या 3’ आधी विद्या ‘दो और दो प्यार’ या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रतीक गांधी, इलियाना डिक्रुझ व सेंथिल राममूर्ती होते. पती पत्नीच्या नात्यावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटाने फक्त ५.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट नंतर डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress distributes food and clothes to needy people video viral on social media hrc