Chhaava box office collection Day 23: विकी कौशल, रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला २० दिवसांनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपट हा २०२५ मधला ५०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. २३व्या दिवशीदेखील ‘छावा’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेंटाइन डे दिवशी १४ फेब्रुवारीला ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अजूनही प्रेक्षक ‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. आता २३व्या दिवशीचं कलेक्शन समोर आलं आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ चित्रपटाने २३व्या दिवशी भारतात १६.५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे एकूण कमाईचा आकडा ५०० कोटी पलीकडे गेला आहे. आतापर्यंत ‘छावा’ चित्रपटाने भारतात ५०८.८ कोटींचा गल्ला जमवला आहे. विकी कौशलच्या आजवरच्या करिअरमध्ये सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ चित्रपट आहे. विकीच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाने २४४.१४ कोटी, ‘राझी’ चित्रपटाने १२३.७४ कोटी, ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने ९३.९५ कोटी आणि ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट ८८.३५ कोटी कमावले होते. विकीचा ‘छावा’ चित्रपट पहिला आहे, जो ५०० कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे.

‘मॅडडॉक निर्मित ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल व्यक्तिरिक्त रश्मिका मंदाना शंभूराजेंची पत्नी येसुबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसंच आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत सिंह, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय बऱ्याच मराठी कलाकारांनी ‘छावा’ चित्रपटात जबरदस्त काम केलं आहे. अभिनेता संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे मराठी कलाकार चांगलेच भाव खाऊन गेले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava box office collection day 23 vicky kaushal rashmika mandanna movie cross 500 crores pps