बॉलीवूड अभिनेत्री तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘क्रू’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामधील मुख्य पात्रांची केमिस्ट्री, पटकथा आणि विनोद या सर्वांचं भरभरून कौतुक करण्यात आलं परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना अनेक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘क्रू’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हवाई सुंदरीची भूमिका साकारणारी तब्बू एका प्रवाशाला आक्षेपार्ह शब्द वापून खाली बस असं सांगते. या जागी मूळ चित्रपटात ‘भुतिये’ हा शब्द वापरण्यात येणार आहे. याशिवाय सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात येणाऱ्या ट्रेलरमध्ये बरेच बदल केले आहेत.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ स्टार प्रवाहची महामालिका, तर अर्जुन-सायलीला मिळाला ‘हा’ पुरस्कार, जाणून घ्या…

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका दृश्यामध्ये ‘हXXXदे’ च्या जागी ‘अमीरजादे’ असा बदल करण्यात आला आहे. याशिवाय ‘हXXयों’च्या जागी चित्रपटात ‘कमीनो’ असा बदल करण्यात आला आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार

तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय ‘क्रू’मध्ये दिलजीत दोसांझही दिसणार आहे. तर, कपिल शर्मा यात कॅमिओ करताना दिसणार आहे. हा चित्रपट राजेश कृष्णन यांनी दिग्दर्शित केला असून एकता आर कपूर, शोभा कपूर, अनिल कपूर आणि रिया कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा : Video : लग्नाची वरात! क्रिती खरबंदा-पुलकित सम्राटचा जबरदस्त डान्स; ‘असा’ पार पडला गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

‘क्रू’ हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. दिवाळखोरीत निघालेल्या एका विमान कंपनीत काम करणाऱ्या तीन एअर होस्टेसची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crew movie cbfc replaced several dialogues of the film in the theatrical cut sva 00