सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली. गेले काही दिवस सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे. लोकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत जैसलमेरच्या एका शाही पॅलेसमध्ये लग्न केलं. आता बाकी मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसाठी त्यांनी मुंबई आणि दिल्लीत एक रिसेप्शन आयोजित करायचं ठरवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यापैकी मुंबईतील रिसेप्शन काल पार पडलं. संपूर्ण बॉलिवूडने या रिसेप्शनला हजेरी लावली. रोहित शेट्टी, अलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अंबानी दाम्पत्य, अभिषेक बच्चन, आशुतोष गोवारीकर अशा कित्येक मंडळींनी हजेरी लावून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री दिशा पटानीने सुद्धा या रिसेप्शनला हजेरी लावली. दिशाने हिरव्या रंगाचा शिमरी बॅकलेस टॉप आणि त्याच रंगाच्या हॉट स्कर्ट परिधान केला होता.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला रणवीर सिंगचा ‘सर्कस’ ओटीटीवर; वाचा कधी, कुठे पाहायला मिळणार?

तिच्या या कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात अशा प्रकारचा भडक आणि विचित्र ड्रेस परिधान करून आल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. एका युझरने त्यावर कॉमेंट केली की, “ही एका बेली डान्सरसारखा पोषाख का करून आली आहे?” तर दुसऱ्या युझरने कॉमेंटमध्ये दिशाच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “हीला जराही फॅशन सेन्स नाही का? तिने परिधान केलेले कपडे हे अत्यंत खालच्या दर्जाचे वाटत आहेत.”

दिशा सोशल मीडियावर सक्रीय असते. बोल्ड लूक आणि तिच्या हॉट कपड्यांमुळे ती कायम चर्चेत असते. नुकतंच ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिशाने लाल ब्रालेट टॉप आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केले होते. तिच्या या लूकवरसुद्धा नेटकरी चांगलेच खवळले होते. “हिला कोणीतरी चांगले कपडे द्या” अशी कॉमेंट करत नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani getting trolled for her hot bold look at siddharth kiaras wedding reception avn