अभिनेता कार्तिक आर्यन हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत मोजकेच चित्रपट केले पण त्या प्रत्येक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. अनेक मुली त्याच्यावर फिदा असतात. आता त्याला एका चहातीने त्याला चक्क लग्नाची मागणी घातली आहे.
कार्तिक आर्यन गेले काही दिवस त्याच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तो आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कामगिरी केली आहे. याच निमित्ताने तो नुकताच ऑस्ट्रेलिया येथे गेला होता. त्यावेळी त्याच्या एका चाहतीने त्याला प्रपोज केलं.
कार्तिकचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एका चित्रपटगृहातील असून यात कार्तिक त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो तिथे गेला होता. तर यावेळी चक्क एका चाहतीने त्याला माईक हातात घेऊन थेट “तू माझ्याशी लग्न करशील का?” असा प्रश्न विचारला. चहातीकडून आलेला हा प्रश्न ऐकताच कार्तिकही थक्क झाला. त्याला काय बोलावं हे सुचेना. पण हा प्रसंग त्याने खूप उत्तमरीत्या हाताळला. त्या चहातीचं मन न दुखावता त्या प्रश्नाला उत्तर देत तो हसत म्हणाला, “हे काय सुरू आहे! त्यांनी मला माझी प्रेम कथा विचारली तर तुम्ही मला थेट लग्नाची मागणी घातलीत. आता माझा स्वयंवर होतंय असं मला वाटतंय. याचं उत्तर मी आता सर्वांसमोर कसं देऊ ते मला कळत नाहीये.”
हेही वाचा : कार्तिक आर्यन करायचा विना तिकीट ट्रेन प्रवास; ‘त्या’ आठवणींना उजाळा देत म्हणाला होता…
त्यावर ती चाहती म्हणाली, “मी तुला एक मिठी मारू शकते का?” त्यावर कार्तिक म्हणाला, “हो नक्कीच. मी तुला एक मिठी मारतो.” आता कार्तिकच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.