बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुझैन खानपासून वेगळं झाल्यानंतर हृतिक रोशन आता सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेक कार्यक्रमात हृतिक आणि सबा एकमेकांबरोबर दिसले होते. नुकतंच नीता आणि मुकेश अंबानी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दोघांनाही एकत्र पाहण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील दोघांच्या लूकची चांगलीच चर्चा झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणारा हृतिक रोशन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हृतिक रोशननं सबा आझादसाठी मुंबईत १०० कोटींचं नघर विकत घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या घरात हृतिक सबाबरोबर लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.’हॉलीवूड लाइफ’नं दिलेल्या माहितीनुसार लग्नाआधी हृतिक रोशननं सबा आझादबरोबर राहण्यासाठी नवीन घर विकत घेतलं आहे. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. हृतिक आणि सबा एकत्र राहत असल्याच्या बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोघांनी एकत्र राहण्याचा प्लॅन केला आहे.

हेही वाचा- “विकी कौशल फ्लॉप आहे आणि त्याला…,” प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने साधला निशाण, ट्वीट चर्चेत

‘इंडिया टुडे’च्या बातमीनुसार, हृतिक रोशननं १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. हृतिक रोशननं एकाच इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन अपार्टमेंट घेतले आहेत. मुंबईतील पॉश भागातील ‘मन्नत’ नावाच्या इमारतीत त्यानं हे फ्लॅट खरेदी केले आहेत, ज्याच्या नूतनीकरणाचं कामही सुरू झालं आहे.

हेही वाचा- “‘बजरंगी भाईजान’च्या क्लायमॅक्समध्ये…” एस. एस. राजामौलींनी दिला होता ‘तो’ सल्ला, म्हणाले, “शेवटी सलमान…”

मात्र, हे सगळं खोटं असल्याचा हृतिक रोशननं याबाबतचा खुलासा केला आहे. हृतिक म्हणाला, “या सगळ्या गोष्टी खोट्या असून यात काहीच तथ्य नाही. एक सामान्य व्यक्तिमत्त्व असल्याने मी नेहमीच चर्चेचा विषय असतो, याची मला जाणीव आहे. परंतु चुकीच्या माहितीपासून दूर राहणं चांगलं, असंही हृतिकनं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan buys apartment of cost of 100 crore to move in with his girlfriend saba azad before marriage reports dpj