कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. डिसेंबर २०२१मध्ये लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. ९ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. लग्नानंतरचा प्रत्येक सण त्यांनी एकत्र साजरा केला. याचे फोटोही त्यांनी शेअर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नानंतर एका वर्षाने आता कतरिना व विकी गुडन्यूज देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच कतरिना-विकीने लग्नानंतरचा दुसरा नाताळ सण कुटुंबियांसह सेलिब्रेट केला. याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये कतरिना कुटुंबियांच्या मागे उभी असल्याचं दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून ती गरोदर असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा>> “तिच्यामुळे शीझान खानचं करिअरही…”, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचं ट्वीट

हेही वाचा>> लग्नानंतर कुंकू न लावल्यामुळे देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणतात “तू पुढची तुनिषा शर्मा…”

कतरिना गरोदर असल्यामुळे बेबी बंप लपवत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक फोटोंमध्ये बेबी बंप दिसू नये म्हणून ती मागे उभी राहते, असं नेटकरी म्हणत आहेत. नेटकऱ्यांनी फोटोवर तशा कमेंटही केल्या आहेत. “कॅट गरोदर आहे का?”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “मला असं वाटतंय कतरिना गरोदर आहे”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “मी तुझ्यावर प्रेम करतो”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकच्या नवऱ्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

विकी-कतरिनाच्या नाताळ सेलिब्रेशनच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. कतरिना शेवटची ‘फोन भूत’ चित्रपटात दिसली होती. तर विकी ‘गोविंदा मेरा नाम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is actress katrina kaif pregnant photos with vicky kaushal goes viral kak