अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. जॅकलिन मूळची श्रीलंकेची असली तरी भारतात तिनं तिच्या अभिनय क्षेत्रातील कामामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचेही पाहायला मिळते; तर जॅकलिन कायम कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. परंतु, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आलीये ते सुकेश चंद्रशेखरमुळे. काही दिवसांपूर्वी सुकेशने कोट्यावधींचा घोटाळा केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. यानंतर सुकेशला शिक्षा ठोठवण्यात आली. तर सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगतोय. अशातच आता सुकेशच्या आयुष्यावर अधारित लवकरच ओटीटीवर एक सीरिज येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सीरिजमध्ये सुकेशचा आतापर्यंतचा प्रवास, त्याने केलेले घोटाळे, त्याच्या आयुष्यात असलेली महत्त्वाची माणसं या सगळ्यांचा उल्लेख असणार आहे आणि यामुळेच जॅकलिन फर्नांडिस पुन्हा चर्चेत आली आहे.

सुकेश व जॅकलिन हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. सुकेश तुरुंगात असतानाही त्यांने मागे जॅकलिनला पत्र पाठवलं होतं, त्यामुळे आता सुकेशवर आधारित सीरिजची चर्चा सुरू असल्याने जॅकलिनलाही याबाबत विचारणा झाल्याचं समोर आलं आहे. तर जॅकलिनने अद्याप तिची बाजू सांगितली नसून सीरिजमध्ये तिला कशाप्रकारे दाखवण्यात येइल याबाबत शाशंक असल्याचं म्हटलं जातय. तर ही सीरिज २०२६ मध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

‘Bigg Boss’ स्क्रिप्टेड आहे का? केदार शिंदेंना पहिल्या सीझनची होती ऑफर; पुढे काय घडलं? म्हणाले, “मी जबाबदारीने…”

दरम्यान, जॅकलिनने अधिकृतपणे याबाबत अजून काहीही भाष्य केलं नाहीये. याव्यतिरिक्त जॅकलिनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची सोनू सूदसोबत ‘फतेह’ चित्रपटात दिसली होती. आता लवकरच ती अजय देवगणबरोबर ‘रेड २’मध्ये दिसणार आहे. याचसह तिचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपटात यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्त, कृती सेनन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, कीर्ती खरबंडा यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez approached for sukesh chandrashekhars docuseries ads 02