दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच तिचा स्पाय-थ्रिलर ‘उलझ’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे; जो सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सुधांशू सरिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपटात जान्हवी भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटाची कथा देशभक्तीवर आधारित असून तरुण मुत्सद्दी सुहानाच्या (जान्हवी कपूर) भोवती फिरणारी आहे. ‘उलझ’ चित्रपटात जान्हवी व्यतिरिक्त गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटातील ज्युनिअर एनटीआर व जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘देवरा: पार्ट १’ या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याचं चित्रपटातील दुसरं गाणं ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित झालं आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत ‘धीरे-धीरे’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात ज्युनियर एनटीआर व जान्हवीची एक सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तसंच दोघांच्या रोमँटिक डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Aditi Sarangdhar: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अदिती सारंगधरची जबरदस्त एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत

Janhvi Kapoor

‘धीरे-धीरे’ हे गाणं प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने संगीतबद्ध केलं असून शिल्पा रावने गायलं आहे. तसंच कौसर मुनीर या गाण्याचे गीतकार आहेत. ‘बँग बँग’, ‘तौबा तौबा’ सारख्या सुपरहिट गाण्यांचा नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने ‘धीरे-धीरे’ गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा – “आता बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने वडील लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल इच्छा केली व्यक्त, म्हणाला…

पहिल्यांदाच ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरला ( Janhvi Kapoor ) पाहून प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे दोघांचं ‘धीरे-धीरे’ नवं गाणं सतत पाहिलं आणि ऐकलं जातं आहे. युट्यूबवर हे गाणं ट्रेंड होतं असून ५७ लाखांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. गाण्यातील जान्हवीला पाहून अनेक प्रेक्षकांनी जुनियर श्रीदेवी म्हटलं आहे.

‘देवरा: पार्ट १’ कोण-कोण कलाकार झळकणार जाणून घ्या…

दरम्यान, ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाचं चित्रकरण जवळपास पूर्ण झालं आहे. माहितीनुसार, चित्रपटातील काही गाण्यांचं चित्रीकरण बाकी असून लवकरच ते पूर्ण केलं जाणार आहे. ‘देवरा: पार्ट १’ चित्रपट २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कोराताला शिवा लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूरसह ( Janhvi Kapoor ) सैफ अली खान, श्रुती मराठे, प्रकाश राज, श्रीकांत, शाइन टॉम चाको आणि नारायण आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor and jr ntr new romantic song dheere dheere release of devara part 1 movie pps