बॉलीवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. वाढदिवसाच्या निमित्तानं जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासह तिरुपतीला गेली होती. जान्हवीनं ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती. या शोमध्ये तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला होता. तिनं शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच जान्हवी कपूर वांद्रे येथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनवाणी पायाने चालत गेली. तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया याची आई स्मृती पहारियादेखील होत्या. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच जान्हवी तिच्या बॉयफ्रेंडमुळे आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजय देवगणच्या ‘मैदान’च्या स्क्रीनिंगसाठी जान्हवीनं हजेरी लावली होती. त्या दिवशी जान्हवीनं फॉर्मल लूक केला होता. सफेद ब्लेझर, मॅचिंग पॅन्ट्स आणि मिनिमल ज्वेलरीची निवड करीत जान्हवीनं हा लूक पूर्ण केला. पण, या लूकमध्ये लक्षवेधक ठरला तो म्हणजे जान्हवीचा नेकलेस.

जान्हवीने खास ‘शिकू’च्या नावाचा नेकलेस परिधान केला होता. जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जान्हवीनं हा खास नेकलेस घालून शिखरबरोबरच्या नात्याबद्दलची पुष्टी केली आहे. फिल्मिग्यान या पापाराझी अकाउंटवरून हा फोटो शे्अर करण्यात आला आहे. जान्हवीच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “नजर नको लागायला.” तर दुसऱ्यानं लिहिलं, “खूप क्यूट आहे.

हेही वाचा… “…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात जान्हवी वरुण धवनबरोबर झळकणार आहे. जान्हवीचा राजकुमार रावबरोबरचा ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘देवरा’ या चित्रपटाद्वारे जान्हवी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor flaunts boyfriend shikhar pahariya neckless as shiku photo viral dvr