अभिनेत्री कंगना राणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. लवकच तिचा ‘तेजस’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान प्रदर्शनाच्या अगोदरच हा चित्रपट एका डायलॉगमुळे चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “ती माझी मुलगी..”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमधील मिस्ट्री गर्लचा विद्या बालनने केला खुलासा, म्हणाली…

एका सोशल मीडिया युजरने या चित्रपटातील एका डायलॉगचा व्हिडीओ ट्वीटवर शेअर केला आहे. या चित्रपटात कंगना एक डायलॉग बोलताना दिसत आहे. हा डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून घेण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा- Video: इस्रायलवर हल्ला होण्यापूर्वीचा नुसरत भरुचाचा व्हिडीओ समोर

चित्रपटात कंगना “भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं” हा डायलॉग बोलताना दिसत आहे. हा डायलॉग नरेंद्र मोदींच्या भाषणातला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या डायलॉगसाठी नरेंद्र मोदींना श्रेय देण्याची मागणी अनेकांनी केली आहे. यावर कंगनाने सकारात्मक प्रतिक्रिया देत ‘हा हा श्रेय देण नक्कीच बनतं.’ असं म्हणलं आहे. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबचा एक व्हिडीओही शेअऱ केला आहे.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायच झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाई करु शकला नाही. आता २७ ऑक्टोबरला तिचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तेजस’ नंतर कंगना ”इमर्जन्सी’ चिंत्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीच्या जीवनावर आधारित आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut reacts to a user asking her to give credit to pm narendra modi for viral dialogue in tejas trailer dpj