तब्बल २२ वर्षांनी ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर २’ला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी सुद्धा ‘गदर २’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावल्याचे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले. अभिनेता कार्तिक आर्यन सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सनी देओलचा चाहता म्हणून ‘गदर २’ पाहायला गेला होता. अभिनेत्याने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “ते बालगुन्हेगार ढसाढसा रडले…”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला शिवराज अष्टक मालिकेचा अनुभव; म्हणाले, “त्या मुलांनी गुन्हेगारी…”

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘गदर २’मधील एक खास सीन शेअर केला आहे. “‘गदर २’चा ‘हा’ सीन सुरु असताना मी चित्रपटगृहात जल्लोष केला. मी तारा सिंगचा चाहता असल्याने हा चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो.” असे कार्तिकने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे. अभिनेत्याच्या मते तो ‘गदर २’ चित्रपटातील ‘आयकॉनिक’ सीन आहे. हा सीन नेमका कोणता जाणून घेऊया…

हेही वाचा : “हल्क, सुपरमॅनसारख्या फेक सुपरहिरोंची चित्रं…”, ‘सुभेदार’च्या कलाकारांना तरुणाने भेट दिले टी-शर्ट, चिन्मय मांडलेकर म्हणाला…

२००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर’च्या पहिल्या भागातील हॅंडपंपच्या सीनला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या भागातही अशाच प्रकारचा सीन दाखवण्यात येत आहे. या सीनची लहानशी झलक कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर हँडपंपचा सीन शेअर करताना कार्तिकने लिहिले की, ‘मला हा आयकॉनिक सीन खूप आवडतो.’ या सीनसह अभिनेत्याने “ढाई किलो का हाथ…” असलेला इमोजीही शेअर केला आहे.

हेही वाचा : “वयाच्या ४७ व्या वर्षीही…” आई-वडिलांना सोडून वेगळं न राहण्याबद्दल अभिषेक बच्चनचं मोठं वक्तव्य

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत “हा गदर चित्रपटातील सर्वात चांगला सीन आहे.”, “कार्तिक नेहमीच इतर अभिनेत्यांचे चित्रपट पाहून कौतुक करतो”, “सनी देओल बॉलीवूडचा खूप मोठा स्टार आहे.” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aaryan shared his favourite scene of gadar 2 actor praised sunny deol video viral sva 00