Premium

झाडाखाली मोकळ्या हवेत प्रसिद्ध अभिनेत्याने कापून घेतले केस; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “सर्वात स्वस्त हेअरकट…”

निसर्गाच्या सानिध्यात केस कापून घेणाऱ्या व्हिडीओतील अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

kartik aaryan haircut video
अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो झाडाखाली बसून केस कापून घेत आहे. झाडाखाली एक खुर्ची टाकली आहे, तिथे तो बसून न्हाव्याकडून केस कापून घेत आहे. जवळच एक बोर्ड दिसतोय, त्यावर केस कापण्यासाठी लिहिलेल्या किमतींनी लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्यांनी मला फोन केला अन्…”, शैलेश लोढांचा असित मोदींबद्दल मोठा दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांप्रमाणे…”

व्हिडीओत दिसणारा हा अभिनेता कार्तिक आर्यन आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो केस कापून घेताना दिसत आहे. तिथे केस कापण्याच्या किमतीची यादी असलेला बोर्डही आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. बोर्डवर हेअरकट – ५ रुपये, झाडाखाली हेअरकट – ७ रुपये आणि कार्तिक आर्यन स्टाइल हेअरकट – ३ रुपये, असं लिहिलं आहे. कार्तिकचा हा व्हिडीओ त्याचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’च्या शूटिंगचा आहे.

‘सर्वात स्वस्त हेअरकट’, ‘कार्तिक आर्यन स्टाइलचे फक्त ३ रुपये?’ ‘केस कापण्याचे फक्त ३ रुपये असले तरी कार्तिक आर्यनचे केस अनमोल आहेत’,’ कार्तिक आर्यन हेअरस्टाइलच्या नावाखाली बाहेर पैसे लुटत आहेत’, ‘मी पण तिथेच येतोय हेअरकट करायला’, अशा कमेंट्स त्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kartik aaryan shares video of haircut under the tree netizens comment viral hrc

First published on: 26-09-2023 at 11:04 IST
Next Story
लग्नात परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी छत्री घेऊन केला डान्स; व्हिडीओ व्हायरल