बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. विकी कौशल अभिनीत 'बॅड न्यूज' या चित्रपटात तृप्ती डिमरी, ऍमी विर्कदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॅड न्यूज'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती आणि विकीची जोडी चर्चेत आली. नंतर या ऑनस्क्रिन कपलचं 'जानम' हे गाणं रिलीज झालं. या गाण्यात तृप्तीचे बोल्ड सीन पाहून आणि दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी कतरिनाच्या एका व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. विकीचं याआधी 'तौबा तौबा' हे गाणं रीलिज झालं होतं आणि या गाण्याची हुकस्टेप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. हेही वाचा. “वय म्हणजे फक्त…”, विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर थिरकली माधवी निमकर; चाहते म्हणाले… कतरिना गेल्या काही दिवसांपासून परदेशात होती. अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यातही ती अनुपस्थित असल्यानं पापाराझींनी विकीला कतरिना कुठे आहे? याबाबत विचारलं. यावर विकी त्यांना म्हणाला होता की ती मुंबईत नाही आहे. कतरिनाने कालच जर्मनीमधला फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. तर आज (गुरूवारी, ११ जुलै रोजी) कतरिना भारतात परतली आणि पापाराझींनी अभिनेत्रीचा एअरपोर्ट लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. कतरिनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी याचा संबंध विकी आणि तृप्तीच्या 'जानम' या गाण्याशी जोडला आहे. https://www.instagram.com/reel/C9QWKw-seLw/?utm_source=ig_embed&ig_rid=c85c6b70-94de-4992-874f-14ab6db5c15a एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, "आता विकीचं काय खरं नाही", तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, "तृप्ती डिमरीबरोबर एक गाणं रिलीज काय झालं, विकीची पत्नी कतरिना लगेच भारतात परत आली." तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, "तुझा पती खूप बिघडला आहे." अशा प्रकारच्या अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आल्या आहेत. विकी आणि तृप्तीच्या 'जानम' या गाण्यात अनेक बोल्ड आणि रोमॅंटिक सीन्स असल्याने नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. हेही वाचा. ओरीने दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवला अन्…; फोटो व्हायरल होताच चाहते म्हणाले, “खोटं नाही आहे…” दरम्यान, आनंद तिवारी दिग्दर्शित ‘बॅड न्यूज’ हा एक विनोदी चित्रपट आहे, जो हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (heteropaternal superfecundation) नावाच्या दुर्मीळ वैज्ञानिक घटनेशी संबंधित आहे, ज्याद्वारे एका महिलेला अनेक पुरुष भागीदारांद्वारे गर्भधारणा करता येते. ‘गुड न्यूज’चा सिक्वेल असलेला हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.