Premium

देव आनंद यांचा जुहूतील ७३ वर्षीय जुना बंगला विकला? दिवंगत अभिनेत्याच्या पुतण्याने सांगितलं सत्य, म्हणाले…

देव आनंद यांनी आयुष्यातील ४० वर्षे पत्नी आणि मुलांसोबत या घरात घालवली होती.

dev aanand
देव आनंद यांचा जुहूतील ७३ वर्षीय जुना बंगला विकला?

दिवंगत अभिनेते देव आनंद यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली होती. दरम्यान देव आनंद यांचा जुहूतील बंगला विकला असल्याची बातमी नुकतीस समोर आली होती. ७३ वर्षीय हा जूना बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला विकला असल्याचे सांगण्यात आले होते. या बातमीने अनेक चर्चांना उधाण आले होते. आता देव आनंद यांचा पुतण्या आणि चित्रपट निर्माते केतन आनंद यांनी या बातमीमागचं सत्य सांगितल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मी कोमात होतो, माझी दृष्टी गेलेली…” मनोज जोशींनी सांगितल्या ‘देवदास’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, केतन आनंद यांनी देव आनंद यांचा जुहूचा बंगला विकला असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. केतन आनंद म्हणाले, “देव आनंद यांचा बंगला विकला असल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. देव आनंद यांची मुलगी देविनाला याबाबत विचारलं आहे त्यांनी कोणताही बंगला विकलेला नाही.”

हेही वाचा- “पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, देव आनंद यांच्या कुटुंबाने त्यांचा जुहूचा प्रसिद्ध बंगला विकला आहे. दिवंगत अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील ४० वर्षे पत्नी आणि मुलांसोबत या घरात घालवली होती. अहवालात दावा करण्यात आला होता की, देव आनंद यांचा बंगला ३५० ते ४०० कोटी रुपयांना विकला गेला आहे. लवकरच हा बंगला पाडण्यात येणार असून त्याजागी २२ मजली टॉवर बांधण्यात येणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा- प्रोपगंडा चित्रपटच का? ‘द व्हॅक्सिन वॉर’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खोडून काढले आरोप

देव आनंद यांच्या निधनानंतर या बंगल्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हतं. त्यामुळेच हा बंगला विकला गेल्याची माहिती मिळाली होती. देव आनंद यांचा मुलगा सुनील अमेरिकेत स्थायिक झाला आहे; तर त्यांच्या पत्नी कल्पना मुलगी देवीनाबरोबर उटी येथे राहतात. दरम्यान, देव आनंद यांच्या कुटुंबीयांनी पनवेलमधील काही जागाही विकल्या आहेत. मिळालेली रक्कम तीन जणांमध्ये वाटण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ketan anand revealed dev anand juhu house not sold dpj

First published on: 21-09-2023 at 13:13 IST
Next Story
“मी कोमात होतो, माझी दृष्टी गेलेली…” मनोज जोशींनी सांगितल्या ‘देवदास’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी