Khushi Kapoor : जान्हवी कपूर सध्या शिखर पहारियाला डेट करीत आहे. सोशल मीडियावर तिच्या लव्ह स्टोरीसह आता तिच्या लहान बहिणीच्या प्रेमाबद्दलही चर्चा सुरू आहेत. खुशी कपूरचं नाव सध्या अभिनेता वेदांग रैनाबरोबर जोडलं जात आहे. या दोघांचा एक फोटो पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे. या फोटोत खुशीनं वेदांगचं नाव लिहिलेलं ब्रेसलेट हातात घातल्याचा दावा काही चाहत्यांनी कमेंटमध्ये केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेदांग आणि खुशी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा चाहत्यांनी या दोघांना काही ठिकाणी एकत्र पाहिलं आहे; मात्र दोघंही एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चांवर काहीही बोलत नाहीत. खुशी आणि वेदांग अद्याप यावर मौन धरून आहेत.

हेही वाचा : ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “घर कोणासाठी घ्यायचं?

खुशी सध्या परदेशात तिच्या सुट्या एन्जॉय करीत आहे. सुट्टी एन्जॉय करताना तिनं सोशल मीडियावर तेथील काही सुंदर आणि हॉट फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तिनं लाल रंगाच्या बिकिनीमधील फोटोसुद्धा पोस्ट केलेत. या सर्व फोटोंमध्ये खुशीच्या हातात एक कॉमन ब्रेसलेट आहे.

खुशीच्या हातात असलेल्या ब्रेसलेटवर इंग्रजीतील अक्षरंसुद्धा आहेत. आता चाहत्यांनी तिचे हे फोटो झूम करून पाहिलेत. तसेच या ब्रेसलेटवर वेदांग रैनाचं नाव असल्याचंदेखील चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे. खुशी आणि वेदांग या दोघांमधील नात्याची आजवर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावर आता खुशीच्या ब्रेसलेटवर वेदांगचं नाव दिसल्यानं चाहत्यांना या दोघांच्या नात्याची खात्री पटली आहे.

खुशी आणि वेदांग दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र तरीदेखील दोघंही फक्त चांगले मित्र आहेत, असेच सांगतात. जिगरा या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मुलाखतीत वेदांगला तो सध्या कुणाला डेट करीत आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर “मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष देत आहे. त्यामुळे डेटिंगच्या बाबतीत मी मागे आहे”, असं वेदांग म्हणाला होता.

हेही वाचा : ‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी

त्या मुलाखतीत वेदांगनं पुढे असंही म्हटलं होतं की, “प्रत्येकाचं खासगी आयुष्य वेगळं असतं. आपल्याला प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य बॅलन्स करता येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रसिद्धीझोतात असता तेव्हा त्या व्यक्तीला कुणालाही डेट करणं कठीण जातं.”

अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांच्या नात्याबद्दलसुद्धा अनेकदा चर्चा रंगल्या. त्यावर जान्हवीनं स्वत: आपल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली आहे. तर, आता जान्हवीची बहीण खुशी तिच्या आयुष्यातील हे खुलासे केव्हा करणार याकडे चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khushi kapoor boyfriend vedang raina name spotted on her bracelet photos viral rsj