Kiara Siddharth Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत होत्या. आता अखेर ६ फेब्रुवारी रोजी ते लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातमीने फक्त त्यांचे चाहतेच नाही तर बॉलिवूड कलाकारही आनंदी झाले आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. दरम्यान नुकतंच अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय या शाही विवाह सोहळ्यासाठी जैसलमेरला रवाना झाले आहेत. नुकतेच कियाराचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सनाही आमंत्रित केलं गेलं असल्याची चर्चा आहे. मीडिया रीपोर्टनुसार या सोहळ्यात या दोघांनी मोजक्याच लोकांना निमंत्रण दिलेलं आहे.

आणखी वाचा : अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’च्या सिक्वलची घोषणा; पुन्हा बघायला मिळणार ज्युनिअर बच्चनचा दमदार अभिनय

‘इंडिया टूडे’च्या रीपोर्टनुसार सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे आपल्या सहकलाकारांना आणि काही दिग्दर्शकांनादेखील या सोहळ्यात बोलवणार आहेत. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत, करण जोहर, वरुण धवन, विकी कौशल कतरिना कैफ, रकुल प्रीत सिंग, जॅकी भग्नानी हे कलाकार या शाही विवाह सोहळ्यात हजेर लावतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

६ फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि कियारा लग्नबंधनात अडकणार आहेत. गेले बरेच महीने त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. लग्नानंतर हे दोघे एक मुंबईत आणि एक दिल्लीत असं रीसेप्शन ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थने नुकतंच त्याच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे तर कियारा सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ आणि राम चरणबरोबर ‘आरसी १५’ या चित्रपटांवर काम करत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani siddharth malhotra wedding update these bollywood celebrities will attend the function avn