Bollywoods 5 richest Celebrity: हुरुन या संस्थेने २०२५ मधील ‘हुरुन रिच इंडिया’ यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत व्यवसाय, उद्योग, मनोरंजन व क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची माहिती आहे.
आता जाणून घेऊयात या यादीत मनोरंजन सृष्टीतील कोणत्या कलाकाराने पहिले स्थान पटकावले आहे. त्याबरोबरच पहिल्या पाच श्रीमंत बॉलीवूड कलाकारांमध्ये कोणाची नावे आहेत.
१. शाहरुख खान
‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’नुसार, शाहरुख खानने भारतातील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी म्हणून आपला दर्जा कायम ठेवला आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याची संपत्ती आता ८७० दशलक्षांवरून १.४ अब्जापर्यंत पोहोचली आहे. १.४ अब्ज म्हणजेच १२,४९० कोटी इतकी त्याची संपत्ती आहे. इतक्या संपत्तीसह तो बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
२. जुही चावला
‘हुरुन इंडिया रिच’ लिस्टमध्ये बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला आहे. अभिनेत्री शाहरुख खानची व्यावसायिक भागीदारदेखील आहे. जुही व तिचे पती जय मेहता यांची एकूण संपत्ती ७,७९० कोटी इतकी आहे. इतक्या संपत्तीसह अभिनेत्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, सर्वांत श्रीमंत अभिनेत्रींमध्ये ती पहिल्या स्थानावर आहे.
३. हृतिक रोशन
शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यानंतर अभिनेता हृतिक रोशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलीवूडच्या या लोकप्रिय अभिनेत्याची एकूण संपत्ती २,१६० कोटी आहे. या संपत्तीमध्ये त्याचा ब्रँड HRX चा मोठा वाटा आहे.
४. करण जोहर
लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि त्याचे कुटुंब चौथ्या क्रमांकावर आहे. ‘हुरुन रिच इंडिया’ लिस्टनुसार त्यांची एकूण संपत्ती १८८० कोटी इतकी आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि धर्मॅटिक एंटरटेन्मेंट (Dharmatic Entertainment) या निर्मिती संस्थांचा करण जोहरच्या संपत्तीत मोठा वाटा आहे.
आता या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर कोण आहे, हे जाणून घेऊयात.
५. बच्चन कुटुंब
‘हुरुन इंडिया रिच’च्या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर बच्चन कुटुंब आहे. त्यांची एकूण संपत्ती १६३० कोटी आहे. त्यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या एकत्रित संपत्तीचा समावेश आहे.
या पाच जणांची एकत्रित संपत्ती २५,९५० कोटी इतकी आहे. मात्र, या लिस्टमध्ये रणबीर कपूर, सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट या आघाडीच्या कलाकारांचा समावेश झालेला नाही. ‘यशराज फिल्म्स’चे प्रमुख आदित्य चोप्रा यांचे नावही या यादीत नाही; तर मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.