सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित 'ते' ट्वीट चर्चेत | Kriti sanon and prabhas will get engaged next week in maldives | Loksatta

सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत

गेले अनेक महिने क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

kriti prabhas

गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी एकमेकांशी लग्न गाठ बांधली. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर-आलिया भट्ट असे अनेक सेलिब्रिटी विवाहबद्ध झाले. तर सध्या सर्वांचंच लक्ष सिद्धार्थ आणि कियारा च्या लग्नाकडे लागलं आहे. आज ही दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. यानंतर आता क्रिती सेनॉन आणि प्रभास यांचाही लवकरच साखरपुडा होणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत.

गेले अनेक महिने क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लवकर असते दोघं ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं असंही बोललं गेलं. तर आता लवकरच दोघं डेस्टिनेशन एंगेजमेंट करणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा : Video: लग्नाआधीच कियारा अडवाणीचा ब्रायडल लूकमधील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

एका परदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेले उमैर संधू यांनी क्रिती आणि प्रभासच्या साखरपुड्याबद्दल एक ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, “ब्रेकिंग न्यूज: क्रिती सेनॉन आणि प्रवास यांचा पुढील आठवड्यात मालदीवमध्ये साखरपुडा होणार आहे. मी त्या दोघांसाठी खूप खुश आहे.” हे ट्वीट वाचल्यानंतर दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. पण अद्याप याची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याचबरोबर क्रिती किंवा प्रभासने देखील याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

हेही वाचा : क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…

दरम्यान यावर्षी प्रभास आणि क्रिती एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटात प्रभास रामाच्या तर क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसेल. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. पण त्यात दाखवलेल्या काही दृश्यांमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटात दिल्या गेलेल्या व्हीएफएक्सवर टीका करण्यात आली. त्यानंतर आता या चित्रपटातील दृश्यांमध्ये बदल करून हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:50 IST
Next Story
सलमान खानच्या वडिलांच्या आयुष्यात ‘महाभारता’ला आहे खूपच महत्त्व, लग्नानंतर का पडलं ‘शंकर’ हे नाव?