Manisha Koirala Makeover: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ते आजही विविध धाटणीच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री मनीषा कोइरालाची ओळख आहे. अभिनेत्रीने ‘मस्का’, ‘इंडिया स्वीट्स अँड स्पायसेस’, ‘शहजादा’, ‘९९ सॉग्स’ या अलीकडील काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत महत्वाच्या भूमिकांत काम केले आहे.

मनीषा कोइरालाने केला मेकओव्हर

याबरोबरच अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती देते. आता अभिनेत्रीने शेअर केलेला एक फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आता मनीषा कोइरालाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हेअरकट करण्यासाठी गेली आहे. हेअरकट आणि मेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. या हेअरकटमुळे तिचा लूक बदलला असल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. ती ३० वर्षांपूर्वी जशी दिसायची तशीच दिसत असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी ती या हेअरकटनंतर अत्यंत सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे. नेटकरी नेमके काय म्हणाले, हे जाणून घेऊ…

एका नेटकऱ्याने लिहिले, “पुन्हा त्या तिशीच्या कशा काय दिसत आहेत?”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “कोणत्याही सर्जरीशिवाय ती सुंदर दिसते”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “नेहमीसारखीच सुंदर दिसत आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही जास्तीत जास्त २८ वर्षांच्या दिसत आहात.”

“सर्वकाळ आवडती अभिनेत्री”, “सुंदर”, “अजूनही तुम्ही खूप सुंदर दिसता”, “खूप तरुण आणि खूप छान दिसत आहात”, “तुम्हीजशा सुंदर दिसता, तसे सौंदर्य दुर्मिळ आहे”, तर एका नेटकऱ्याने ‘हीरामंडी’मधील अभिनेत्रीच्या कामाचे कौतुक करत लिहिले, “तुम्ही हीरामंडीमध्ये खूप छान काम केले आहे.”

दरम्यान, मनीषा कोइराला ‘हीरामंडी’ या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या वेबसीरीजमधील अभिनेत्रीच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे, पाहणे महत्वाचे ठरणार आहे.