प्रियांका, कतरिना व आलियाच्या ‘जी ले जरा’मध्ये शाहरुख खानची एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत?

तो या चित्रपटात दिसणार हे कळल्यावर त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

jee le zaraa

एका मल्टीस्टारर चित्रपटाची गेले अनेक महिने चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘जी ले जरा’. एक दोन नव्हे तर तब्बल तीन अभिनेत्री या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा मागच्या वर्षी करण्यात आली होती. तर आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अशातच या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे अभिनेता शाहरुख खानची झलक या चित्रपटात दिसणार आहे.

शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या खूप चर्चेत आहे. पठाण या चित्रपटातून त्याने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. तर यानंतर आता त्याचा ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. तर याच बरोबर शाहरुख खान सलमान खानचा ‘टायगर ३’ या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसेल.

आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्

तर या पाठोपाठ आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असल्याचं कळत आहे. प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकेल असं बोललं जात आहे. तो या चित्रपटात दिसणार हे कळल्यावर त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. पण शाहरुख खानच्या या चित्रपटातील एंट्रीबाबत अद्याप निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : “आमच्या मुलीचं नाव तू ठेव,” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला…

झोया अख्तर या चित्रपटासाठी लेखिका रीमा कागतीबरोबर मिळून जोरदार तयारी करत आहे. झोया स्वतः या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर फरहान अख्तर या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:38 IST
Next Story
Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..”
Exit mobile version