Radhika Merchant and Anant Ambani Video: अनंत अंबानी व राधिका मर्चंट हे जोडपे सातत्याने चर्चेत असते. १२ जुलै २०२४ रोजी अनंत अंबानी राधिका मर्चंट यांनी लग्नगाठ बांधली. अनंत अंबानी हा उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे.

सार्वजनिक ठिकाणी राधिका व अनंत अनेकदा दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका जवळच्या मित्राच्या लग्नात ते सहभागी झाले होते. त्या संगीत सोहळ्यात राधिकाने तिच्या मैत्रिणींबरोबर डान्स केला होता. ‘हाउसफुल्ल २’ चित्रपटातील ‘अनारकली डिस्को चली’ गाण्यावर ती थिरकताना दिसली होती.

आता राधिका मर्चंट व अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, याचे कारण म्हणजे गणेशोत्सवातील तिचा एक व्हि़डीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. इन्स्टंट बॉलीवूडने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

ती गणपती बाप्पा मोरया असे मोठ्याने म्हणत आहे. तसेच, गर्दीत असलेल्या अनंतवर ती फुलेदेखील उधळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्याबरोबर तिचे बॉडीगार्ड तसेच ओरीदेखील दिसत आहे.

आता या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी राधिका व अनंतच्या नात्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी ओरीबाबतदेखील कमेंट्स केल्या आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

एकाने लिहिले, “ओरी या गँगमध्ये कसा पोहोचला. अंबानींनी याच्यात काय पाहिले”, “ओरीला पहिल्यांदा कोणी पाहिले”, “किती छान”, “हा ओरी प्रत्येक ठिकाणी पोहोचतो”, “हा ओरी प्रत्येक ठिकाणी का दिसतो”, “गणपती बाप्पा मोरया”, “ओरी तिथे काय करत आहे?”, “राधिका खूप क्यूट आहे”, “या उत्सवात ओरीला पाहून आश्चर्य वाटले, कारण तो मुलींबरोबर पार्टी करताना दिसतो”, “अंबानी कुटुंब कायमच मला आश्चर्यचकित करते. त्यांचे पाय कायमच जमिनीवर असतात”, “ओरीला यांनी दत्तक घेतले आहे का?”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. याबरोबरच, ज्या पद्धतीने राधिकाचा बॉडीगार्ड तिला सांभाळत आहे, त्याचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्याला जेंटलमन असल्याचे म्हटले आहे.

ओरीबद्दल बोलायचे तर राधिका व अनंत यांच्या लग्नसोहळ्यातदेखील तो दिसला होता. तसेच, काजोलची मुलगी निसा, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे तसेच जान्हवी कपूर अशा कलाकारांबरोबर, त्यांच्या मुलांबरोबर तो अनेकदा दिसतो, त्यामुळे त्याची मोठी चर्चा होताना दिसते.