बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकासारखं स्टारडम हे फक्त सध्या २ अभिनेते अनुभवत आहेत ते म्हणजे रणबीर कपूर आणि रणवीर सिंग. दोघांच्या नावात बरंच साम्य असलं तरी दोघांची कामाकडे बघायचा दृष्टिकोन प्रचंड वेगळा आहे. नुकतंच सिनेअभ्यासक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी याविषयी भाष्य केलं आहे. या दोघांमधला नेमका फरक त्यांनी मांडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये रणबीर कपूरचे २ चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी एक शमशेरा सुपरफ्लॉप ठरला, तर ‘ब्रह्मास्त्र’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. रणवीर सिंगचे मात्र २०२२ मध्ये बहुतेक सगळेच चित्रपट आपटले, ‘८३’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि नुकताच आलेला ‘सर्कस’ हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणकून आपटले. असं नेमकं का झालं यामागचं कारण तरण आदर्श यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : Mirzapur Season 3 : गुड्डू भैय्या कि कालीन भैय्या; कोण होणार ‘मिर्झापूर’चा किंग? लवकरच होणार मोठी घोषणा

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना तरण आदर्श म्हणाले. “रणबीर कपूरने स्वतःला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील झगमगाटापासून लांब ठेवलं आहे. रणबीर सोशल मीडियावर नाही, तसेच तो सार्वजनिक कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये फार कमी दिसतो, एयरपोर्टवरचे त्याचे लुक्स व्हायरल होत नाही, त्याने चाहत्यांच्या मनातील स्वतःबद्दलची उत्सुकता कायम ठेवली आहे. दुसरीकडे रणवीर सिंग मात्र प्रत्येक इवेंटमध्ये आपल्याला दिसतो, त्याचे सोशल मीडिया पोस्ट, एयरपोर्ट लूक व्हायरल होतात, टीव्हीवरील असंख्य जाहिरातीत दिसतो, आणि जेव्हा त्याचा चित्रपट येतो तेव्हा ती उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत नाही. रणबीरकडचा हा गुण रणवीरकडे नाही.”

जे ७० च्या काळातील अभिनेत्यांना जमत होतं ते सध्या रणबीर कपूरला येतंय त्यामुळेच त्याची ही गोष्ट मला प्रचंड आवडते असंही तरण आदर्श यांनी स्पष्ट केलं आहे. रणबीर कपूरचे ‘तू झुठी मै मक्कार’ आणि ‘अॅनिमल’ हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, तर रणवीर सिंग ‘रॉकी और रानीकी प्रेम कहानी’ या चित्रपटात अलिया भट्टसह झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor has one quality which ranveer singh doesnt have says trade expert taran adarsh avn