Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गुन्हेगारी विश्वावर बेतलेल्या या वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटचा सीझनने चाहत्यांना कथेच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना आश्चर्यचकित केले असल्याने या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत आहे.

‘मिर्झापूर’मध्ये आता पुढे काय होणार आहे, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. कालीन भैय्या हे त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की गुड्डू भैय्या हाच ‘मिर्झापूर’चा राजा होणार? याविषयी सध्या प्रेक्षक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. समजा गुड्डू पंडितला तुरुंगात जावे लागले तर मिर्झापूरची सर्व सूत्रं गोलूच्या हाती येऊ शकतात, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. नेमकं ‘मिर्झापूर’वर आता कोणाचं वर्चस्व असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

आणखी वाचा : मोलकरणीने चोरला ‘शार्क टँक इंडिया’फेम नामिता थापरचा फोन अन् केली ‘ती’ पोस्ट; नेटकऱ्यांनी केलं प्रचंड ट्रोल

मीडिया रिपोर्ट्सनुसार मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू असून त्याचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वेबसीरिजचे निर्माते आणि प्राइम व्हिडिओ लवकरच या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा तिसरा सीझनसुद्धा अॅक्शन आणि ड्रामाने भरलेला असेल. यासोबतच सीरिजमध्ये काही जुनी पात्रंसुद्धा फ्लॅशबॅकमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वेबसीरिजचे लाखो चाहते जरी असले तरी या तिसऱ्या सीजनवर बंदी घालण्याची एक याचिका मध्यंतरी न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आलेली दृश्य, भाषा यामुळे याच्या तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मिर्झापूर येथील एका रहिवाश्यानेच ही याचिका दाखल केल्याचं स्पष्ट झालं होतं. पंकज त्रिपाठी, अली फझल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे.