Rolls-Royace Cullinan Series II Price : प्रसिद्ध रॅपर, गायक-गीतकार बादशाहने एक आलिशान लक्झरी कार खरेदी केली आहे. बादशाने त्याच्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्वात आलिशान एसयूव्ही, रोल्स-रॉइस कलिनन सीरिज II (Rolls-Royace Cullinan Series II) समाविष्ट केली आहे. ही कार भारतात काही मोजक्याच लोकांकडे आहे, त्यापैकी एक बादशाह देखील आहे.
Rolls-Royace Cullinan Series II ही कार भारतात मुकेश अंबानी, अल्लू अर्जुन, शाहरुख खान, भूषण कुमार आणि अजय देवगण सारख्या काही मोजक्याच लोकांकडे आहे. आता या यादीत बादशाह सामील झाला आहे. बादशाहने सोशल मीडियावर त्याच्या नवीन कारची झलक दाखवली.
बादशाहने व्हिडीओमध्ये, कारवरील एक कस्टम नेम टॅग दाखवला आणि कॅप्शनमध्ये ‘Zen Wale Ladke’ असं लिहिलंय. बादशाहच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
बादशाहने शेअर केलेला व्हिडीओ
बादशाहच्या कारची किंमत किती?
नवीन Cullinan Series II ची मुंबईत ऑन-रोड किंमत अंदाजे १२.४५ कोटी रुपये आहे. यात ६.७५-लिटर ट्विन-टर्बो V१२ इंजिन आहे जे ५६३ बीएचपी आणि ८५० एनएम टॉर्क जनरेट करते. ही जगातील सर्वात आलिशान एसयूव्हींपैकी एक मानली जाते. कारचा लूक खूपच हटके व सुंदर आहे. कारमध्ये इल्युमिनेटेडे ग्रिल, स्लिमर हेडलाइट्स आणि २३-इंच ऑप्शनल व्हील्स आहेत.
बादशाहचे कार कलेक्शन
बादशाहकडे Rolls-Royace Wraith कार आहे. तसेच त्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी उरुस (Lamborghini Urus), पोर्श केमन (Porsch Cayman), ऑडी क्यू८ (Audi Q8), जीप रँग्लर रुबिकॉन (Jeep Wrangler Rubicon), बीएमडब्ल्यू ६४०डी (BMW 640d), मर्सिडीज-बेंझ एस-क्लास (Mercedes-Benz S-Class) आणि जीएलएस ३५०डी (GLS 350d) यांचा समावेश आहे.
दरम्यान, बादशाहने बॉलीवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याचे रॅप साँग खूपच लोकप्रिय आहेत. अलीकडेच त्याने वजन कमी केलं, त्यामुळे त्याचा नवा लूक चर्चेचा विषय ठरला आहे.