बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकेमुळे, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती(Rhea Chakraborti) दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या निधनानंतर मोठ्या चर्चेत आली होती. आता ती आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने नुकतीच हजेरी लावली होती. त्यावेळी आमिर खानने रियाच्या धाडसाचे कौतुक केले. आमिर खान म्हणाला, “तुझ्याबरोबर जे काही घडलं ते दु:खद होतं, असं मी म्हणेन. तुझं आयुष्य ज्या प्रकारे बदललं आणि ज्या पद्धतीने तू संयम दाखवलास. तू स्वत:वरचा विश्वास ढळू दिला नाहीस. आम्ही सगळेच त्यातून खूप काही शिकू शकतो. अशा परिस्थितीत माणसाचे धैर्य खचून जाऊ शकते. तू आयुष्याची नवीन सुरुवात केलीस. ज्या लोकांना आजही वाटते की तू चुकीची आहेस, त्या लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहचवली गेली आहे. मी आशा करतो की त्यांना लवकर सत्य परिस्थिती समजली पाहिजे.”

काय म्हणाली रिया?

यावर बोलताना रियाने म्हटले, “सुशांतच्या निधनानंतर मी नैराश्यामध्ये गेले होते. आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू करण्यासाठी मला मोठा प्रवास करावा लागला. दु:ख, नैराश्य यासारख्या अनेक गोष्टी होत्या. मला त्यातून बाहेर यायला वेळ लागला पण आता मला नवीन ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते. मला नवीन लोकांना भेटल्यासारखे वाटते. माझी उत्सुकता पुन्हा जागृत झाल्यासारखी वाटत आहे. लोकांच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची माझी इच्छा नसायची. आता नैराश्यातून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा सूर्योदय होत असल्यासारखे वाटत आहे.”

हेही वाचा: Kangana Ranaut : “..तर कंगना रणौत यांचा शिरच्छेद करु”, धमकीचा व्हिडीओ मेसेज आल्याने खळबळ

पुढे ती म्हणते, “माझ्या वाढीच्या काळात माझ्या आजूबाजूला जे वातावरण होते, त्यामुळेदेखील मी अशा परिस्थितीत धैर्य दाखवू शकले. माझे वडील सैन्यात होते. लहानपणापासून मी बघत होते, जेव्हा माझे वडील आम्हाला सोडून सैन्यात परतायचे त्यावेळी याची शाश्वती नसायची की ते परत येतील, आम्हाला भेटतील. आयुष्य अवघड आहे, हे मला मी जशी मोठी होत गेले तसतसं समजू लागले होते. संघर्ष करण्याची आणि कधीही हार न मानण्याचे कला मी शिकले होते. कायम आशावादी राहायला शिकले होते. ते तुमच्या डीएनए मध्ये आपोआपच येते. तुम्ही सहजपणे हार मानत नाही.” असे रियाने म्हटले. त्यावर आमिर खानने तिला “तू मोठे धैर्य दाखवले आहेस आणि त्याबद्दल तुला स्वत:चा अभिमान वाटायला पाहिजे.” असे म्हटले आहे.

दरम्यान, २०२० मध्ये जेव्हा अभिनेता सुशांत सिंग राजपुतचे निधन झाले, त्यावेळी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhea chakraborti open ups about depression after sushant singh rajput death nsp