एका एमएमएसमुळे या बॉलीवूड अभिनेत्रीचं करिअर संपलं. अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीच्या करिअरवर कॉन्ट्रोव्हर्सीचा असा परिणाम झाला की तिला बॉलीवूड सोडावं लागलं. नंतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये तिने नशीब आजमावलं, पण तिला यश आलं नाही. ही अभिनेत्री म्हणजे रिया सेन होय.
रिया सेनचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. ते कूचबिहारच्या राजकन्या इला देवी यांचे पूत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे पुतणे होते. रिया सेनची आई मून मून सेन आणि आजी सुचित्रा सेन या दिग्गज अभिनेत्री होत्या. रियाने पाच वर्षांची असताना अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने पहिल्यांदा पडद्यावर आईबरोबर काम केलं होतं. ‘विष्कन्या’ चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.
‘डीएनए’ च्या वृत्तानुसार, १९९८ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये रियाने काम केलं आणि ती लोकप्रिय झाली. नंतर तिने अनेक चित्रपट, संगीत व्हिडीओ केले. ती फॅशन शोमध्ये सहभागी झाली. २००१ साली आलेला ‘स्टाइल’ हा तिचा पहिला हिट चित्रपट होता. मग तिने ‘झनकार बीट्स’ आणि मल्याळम सिनेमा ‘अनंथभद्रम’मध्ये काम केलं होतं. या काळात रियाच्या अफेअरच्या चर्चाही होऊ लागल्या.
रियाची अफेअर्स
रिया सेन आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. रियाचे अफेअर एकेकाळी चर्चेचा विषय असायचे. जॉन अब्राहम बिपाशाआधी रियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांना लग्न करायचं होतं, पण नंतर ते वेगळे झाले. २००५ साली रिया सेन आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. यादरम्यान दोघांचा एक एमएमएस लीक झाला आणि मग खूप मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यावेळी काही लोकांनी रियाने लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच हा एमएमएस जाणीवपूर्वक लीक केल्याचा आरोप केला होता, पण रिया आणि अश्मित दोघांनीही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं. रिया आणि अश्मितचा एमएमएस फेक होता, पण तो लीक झाल्याने तिचे करिअर उद्ध्वस्त झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रियाचे अक्षय खन्ना आणि एका प्रसिद्ध लेखकाशी अफेअर होते. पण ते काही काळाने वेगळे झाले, असं म्हटलं जातं. रियाचं नाव माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीशांतशी जोडलं गेलं होतं. अखेर रियाने २०१७ मध्ये शिवम तिवारीशी लग्न केलं.
एमएमएस लीक झाल्यानंतर रियाला बॉलीवूडपासून दूर जावे लागले. काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या रियाने प्रादेशिक भाषांमधील काही चित्रपटांमध्ये काम केले. ती ‘अलिशा’, ‘रागिनी एमएमएस: रिटर्न’, ‘जहर’ आणि ‘मिसमॅच २’ या वेब सीरिजमध्येही झळकली, पण ओटीटीवरही तिला फारसं यश मिळालं नाही.