"सुपरस्टार झाल्यानंतर नातं जपलं नाही आणि कुणालाही..." सलमान खानच्या वडिलांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठा खुलासा | Salim Khan says Amitabh Bachchan did not maintain his relationship with him in interview with arbaz khan see details | Loksatta

“सुपरस्टार झाल्यानंतर नातं जपलं नाही आणि कुणालाही…” सलमान खानच्या वडिलांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठा खुलासा

सलमान खानचे वडील व ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांचं अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठं वक्तव्य, काय म्हणाले सलीम खान?

amitabh bachchan salim khan
सलमान खानचे वडील व ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांचं अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठं वक्तव्य, काय म्हणाले सलीम खान?

ज्येष्ठ अभिनेते सलीम खान यांनी आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘जंजीर’ हा चित्रपट त्यांच्या व जावेद अख्तर यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. शिवाय या चित्रपटाने बिग बी अमिताभ बच्चन यांनाही एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अमिताभ यांनी ‘जंजीर’नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. अरबाज खानच्या ‘द इनव्हिसिबल विथ अरबाज खान’ या शोमध्ये सलीम खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अमिताभ यांच्याबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – वनिता खरातने ‘या’ रिसॉर्टमध्ये केलं लग्न, खर्च केले हजारो रुपये, जेवणाचीच किंमत आहे तब्बल…

‘जंजीर’ चित्रपटाबाबत बोलताना अमिताभ यांच्याबाबत सलीम यांनी काही खुलासे केले. सलीन खान व जावेद अख्तर यांची जोडी काही कारणास्तव तुटली. दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. दरम्याम अमिताभ व सलीन खानही एकमेकांपासून दूर झाले. याचबाबत बऱ्याच वर्षांनंतर सलीम यांनी भाष्य केलं.

आणखी वाचा – Video : …अन् त्याक्षणी ढसाढसा रडली होती जिनिलीया देशमुख, लग्नाचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ते म्हणाले, “नातं टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर (अमिताभ बच्चन) होती. तुम्ही जेव्हा सुपरस्टार होता तेव्हा एकमेकांना भेटणं, नातं टिकवणं ही सर्वस्वी तुमची जबाबदारी असते. पण काही कारणास्तव अमिताभ यांनी ते नातं ठेवलंच नाही.” अमिताभ कोणालाही त्यांच्या जवळ येऊ देत नाहीत असं सलीम खान यांचं म्हणणं आहे.

१९८९मध्ये पुन्हा सलीम खान व अमिताभ यांनी ‘तुफान’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं. पण या दोघांमध्ये कधीच मैत्री झाली नाही. याबाबतच सलीम खान म्हणाले, “अमिताभ माझे जवळते मित्र आहेत असा दावा मी कधीच केला नाही. अमिताभ यांचं वागणं फक्त माझ्याबरोबरच नव्हे तर सगळ्यांबरोबरच एकसारखं आहे. ते कोणालाच स्वतः जवळ येऊ देत नाहीत.” पण अमिताभ यांनी त्यांचं काम अगदी उत्तम केलं असल्याचंही यावेळी सलीम खान यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:09 IST
Next Story
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या लग्नाचा खर्च आला समोर, तीन दिवसांसाठी तब्बल…