Sara Ali Khan in Kedarnath : हिंदू भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ धाम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. कारण, हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे दरवर्षी लक्ष्मीपूजन झाल्यावर मंदिराचे द्वार बंद केले जातात. त्यानंतर मंदिर थेट सहा महिन्यांनी म्हणजेच एप्रिल किंवा मे महिन्याच्या आसपास उघडलं जातं. यंदा १० मे २०२४ रोजी मंदिराचं द्वार उघडण्यात आलं होतं. यानंतर बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता मंदिर बंद होण्याआधी आणखी एक अभिनेत्री केदारनाथला पोहोचली आहे, ती म्हणजे सारा अली खान. २०१८ मध्ये अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ चित्रपटातून साराने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. यामध्ये सारा अली खान आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचं शूटिंग केदारनाथ मंदिर परिसरात सुद्धा करण्यात आलं होतं. तेव्हापासून अभिनेत्री दरवर्षी आवर्जून मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाते.

हेही वाचा : “निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

सारा अली खानने ( Sara Ali Khan ) तिचे केदारनाथ यात्रेदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मंदिरात जाऊन दर्शन, वासुकी तलावापर्यंत ट्रेक, रात्रीची पूजा, होमहवन या सगळ्या गोष्टी केदारनाथ यात्रेदरम्यान साराने केल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. याआधी एक वर्ष सारा जान्हवी कपूरबरोबर या यात्रेला आली होती.

फोटो शेअर करत सारा लिहिते, “जय श्री केदार! खळखळणारी मंदाकिनी नदी, आरतीचा मन तल्लीन करणारा आवाज आणि भरून आलेले ढग…आता पुन्हा येईन तोपर्यंत जय भोलेनाथ” अभिनेत्रीच्या चाहत्यांनी हे फोटो पाहून तिचं कौतुक केलं आहे. यातील एका शेवटच्या व्हिडीओमध्ये सारा कानटोपी, जाड असं स्वेटर घालून मंदिर परिसरात वावरतेय. यावरून त्या भागात किती कडाक्याची थंडी असेल याचा अंदाज येतो.

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरला मिळालं गोड Surprise! शोमध्ये आई अन् पत्नीची उपस्थिती; त्याचे सावत्र वडील म्हणाले, “आम्ही सगळे…”

‘या’ दिवशी बंद होणार मंदिराचे दरवाजे

भाविकांना यंदा केदारनाथ मंदिरात २ नोव्हेंबरपर्यंत दर्शन घेता येणार आहे. कारण, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी बाबा केदारनाथ मंदिराचे द्वार बंद होणार आहेत. या सहा महिन्यांच्या काळात केदारनाथची मूर्ती पूजेसाठी उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात आणली जाते आणि केदारनाथ धामचं दर्शन बंद केलं जातं. आता २०२५ मध्ये पुन्हा दर्शनासाठी दरवाजे केव्हा उघडले जाणार याची माहिती उत्तराखंड प्रशासनाकडून अधिकृतरित्या जाहीर केली जाईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan visit kedarnath temple shares beautiful photos when will temple close in 2024 sva 00