ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका हिंदू संघटनेने ‘आदिपुरुष’बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटात ‘रामायण’, ‘भगवान श्रीराम’ आणि हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. चित्रपटाला सोशल मीडियावरुनही प्रचंड विरोध होत आहे. प्रेक्षकांनी त्यांचा राग या माध्यमातून व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर IMDb या वेबसाइटवरही या चित्रपटाला सर्वात कमी रेटिंग मिळालं आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’बद्दल प्रेक्षकांच्या मनात एवढा संताप का? चित्रपटातील ‘या’ सात गोष्टी ठरल्या कारणीभूत

प्रभू श्रीराम, सीता यांच्या लूकवर तर प्रेक्षक आधीपासूनच भडकले होते. रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या लूकबाबतही अशीच प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे. रावणाचाही लूक, वेशभूषा, हेयरस्टाईल, देहबोली सगळंच लोकांना खटकलं आहे. याबरोबरच रावणाचा आणखी एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लीपमध्ये रावण त्याच्या पाळीव अशा वटवाघूळ सदृश्य प्राण्याला मांसाचे मोठमोठे तुकडे खाऊ घालत आहे.

रावणावर चित्रित झालेला हा सीन पाहून लोक चांगलेभडकले आहेत. रावण हा ब्राह्मण होता, तो शिवभक्त होता असं म्हणत या सीनची लोकांनी टीका केली आहे. याबरोबरच सोन्याच्या लंकेचं काळ्या कुट्ट अशा कोळशाच्या खाणीप्रमाणे चित्रीकरण पाहून लोक प्रचंड भडकले आहेत. या चित्रपटातील हे सीन काढून टाकण्यात यावेत अशी विनंती होत आहे तर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ हा ट्रेंड व्हायरल होत आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scene of ravan feeding meat to his dragon from adipurush getting viral on social media avn