अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या ‘जवान’ चित्रपटाने जगभरात हजार कोटींची कमाई केल्यावर अभिनेत्याने नुकतंच एक्सवर ‘आस्क एसआरके’ सेशन घेतलं. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरं दिली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘जवान’नंतर लवकरच येणार शाहरुख खानचा ‘डंकी’? राजकुमार हिरानींच्या ‘त्या’ ट्वीटची जोरदार चर्चा; म्हणाले, “ट्रेलर…”

किंग खान आणि किंग कोहलीच्या चाहत्यांची एक्सवर सतत भांडणं सुरु असतात. यासंदर्भात शाहरुख खानला ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “सर, विराट कोहलीबद्दल काहीतरी सांगा कारण, दररोज आम्ही तुम्हा दोघांच्या फॅन्स क्लबमध्ये होणारी भांडणं पाहतो.”

हेही वाचा : “‘जवान’च्या कमाईचे आकडे खोटे?”, अखेर शाहरुख खानने सोडलं मौन, नेटकऱ्याला उत्तर देत म्हणाला, “गप्प बस…”

चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, “मला विराट कोहली खूप आवडतो. तो माझ्यासारखाच आहे. त्याच्या भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मी नेहमीच प्रार्थना करेन. भाऊ आपला जावई आहे.” किंग खानच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराटबद्दल दिलेलं उत्तर पाहून अनेकांनी त्याला “तू अनुष्काला मुलगी मानतोस का?” असा प्रश्न त्याला विचारला आहे.

हेही वाचा : “मी खूप वाईट आहे ना?”, जिनिलियाच्या प्रश्नावर रितेश देशमुख म्हणाला “तुला माहिती…”; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाच्या यशानंतर लवकरच शाहरुख खानचा बहुचर्चित डंकी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटात त्याच्यासह तापसी पन्नू प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan replies to fan when asked about virat kohli says damad hai sva 00