बॉलीवूडमधील चित्रपटातील नायक आणि नायिका यांच्या वयातील फरक हा अनेकदा चर्चेचा मुद्दा असतो. इंडस्ट्रीतील अनेक आघाडीची अभिनेते त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींबरोबर चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसले आहेत. केवळ बॉलीवूडमध्येच नाही, तर देशभरातील जवळपास सर्वच इंडस्ट्रीत हे चित्र पाहायला मिळतं.

बॉलीवूडमधील सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, नवाजुद्दिन सिद्दीकी, अजय देवगण अशा सर्वच आघाडीच्या नायकांनी त्यांच्या वयापेक्षा कमी वय असलेल्या अभिनेत्रींबरोबर चित्रपटात रोमान्स केला आहे. यात आता अभिनेता रणवीर सिंहचं नावही सामील झालं आहे.

रणवीरच्या आगामी ‘धुरंधर’ या चित्रपटामध्ये, रणवीर सिंहचं वय ४० आहे; तर त्याच्याबरोबर सारा अर्जुनने काम केलं आहे. जिचं वय २० वर्षे आहे. त्यामुळे दोघांच्या वयामध्ये २० वर्षांचं अंतर आहे. दोघांच्या वयामधील या अंतरामुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहेत.

फोटो सौजन्य : ‘धुरंधर’ चित्रपट ट्रेलरमधील स्क्रीनशॉट

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनेही २८ वर्ष लहान अभिनेत्रीबरोबर रोमान्स केला होता. २०२३ साली आलेल्या ‘टीकू वेड्स शेरु’ या चित्रपटात नवाजुद्दिन ४९ वर्षांचा होता; तर अवनीत फक्त २१ वर्षांची होती. दोघांच्या वयात २७ वर्षांचा फरक होता.

फोटो सौजन्य : ‘टीकू वेड्स शेरु’ इंडियन एक्स्प्रेस

सलमान खाननेही त्याच्या अनेक चित्रपटात कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर अभिनय केल्याचे पाहायला मिळालं आहे. नुकत्याच आलेल्या ‘सिकंदर’ चित्रपटामध्ये तो ३० वर्ष लहान रश्मिका मंदानाबरोबर दिसला होता. तर ‘दबंग ३’मध्ये, सलमान खान सई मांजरेकर या त्याच्या वयापेक्षा लहान अभिनेत्रीबरोबर झळकला होता. त्यावेळी तो ५४ वर्षांचा होता आणि सई १८ वर्षांची होती.

फोटो सौजन्य : ‘दबंग ३’ इंडियन एक्स्प्रेस

२०१३ मधील ‘हिम्मतवाला’च्या रिमेकमध्ये अजय देवगण ४३ वर्षांचा होता, तर तमन्ना भाटिया २३ वर्षांची होती. २५ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटात अभिनेता ३२ वर्षीय मृणाल ठाकूरबरोबर मुख्य भूमिकेत आहे. दोघांमधील वयात २४ वर्षांचा फरक आहे.

फोटो सौजन्य : हिम्मतवाला इंडियन एक्स्प्रेस)

अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा २०२२ या वर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी अक्षय कुमार ५४ वर्षांचा होता; तर मानुषी छिल्लर २५ वर्षांची होती. दोघांमधील वयाचं अंतर हे २९ वर्षांचं होतं.

नुकत्याच नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘आप जैसा कोई’ या चित्रपटात ५५ वर्षांच्या आर. माधवन आणि ३३ वर्षांच्या फातिमा सना शेख यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांमधील वयामध्ये २२ वर्षांचा फरक आहे.

याशिवाय आगामी ‘भूत बांगला’ या चित्रपटात अक्षय कुमार (५६ वय) वामिका गब्बीबरोबर (३० वय) अभिनय करताना दिसणार आहे. दोघांमध्ये एकूण २६ वर्षांचं अंतर आहे.