बॉलीवूड स्टार शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कपल आहेत. शाहिद आणि मीरा माध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर अनेकदा आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. शाहिदचं मीराशी लग्न होण्यापूर्वी तो बॉलीवूड अभिनेत्रींच्या अनेकदा प्रेमात पडला. परंतु, काही कारणास्तव त्याची लव्हस्टोरी अपूर्णच राहिली. नुकतीच शाहिद आणि त्याची पत्नी मीरानं नेहा धुपियाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. शोदरम्यान शाहिदने खुलासा केला की त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सनी त्याची फसवणूक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ शोला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा शाहिदला विचारलं की प्रेमात तुझी कोणी फसवणूक केलेली का? यावर शाहिद हसला आणि म्हणाला, “हो एका मुलीने केलीय माझी फसवणूक. एकीबद्दल मला थोडी शंका आहे की तिने केली असावी की नसावी. त्यामुळे हो दोन मुलींनी माझी प्रेमात फसवणूक केलेली आहे. पण मी त्यांच नाव घेणार नाही.”

जेव्हा शाहिदने त्या मुलींचं नाव घेण्यास नकार दिला तेव्हा नेहाने त्याला विचारलं की, “ज्यांना तू डेट केलेलंस त्या दोन प्रसिद्ध महिला आहेत का?” यावर शाहिद म्हणाला, “मी याचं उत्तर देणार नाही.”

हेही वाचा… “माझ्या आईने त्याला खूप झापलं होतं”, ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ फेम रोहित राऊतला ओरडली होती जुईलीची आई; गायकाने सांगितला सासूबाईंचा किस्सा

शाहिदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लावून अभिनेत्रींची नावं कमेंट्स करून अंदाज लावला आहे. अनेकांनी करीना कपूर आणि प्रियांका चोप्राचं नाव कमेंटमध्ये लिहिलं आहे तर, अनेकांनी अमृता रावचंही नाव यात घेतलं आहे.

यापूर्वी ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिदने त्याच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं होतं. शाहिद म्हणाला होता, “नेहमी तुमच्या पत्नीचं ऐका. तिला जे योग्य वाटतंय ते करा. सुरुवातीला मी तिचं म्हणण नाकारायचो परंतु आता आठ वर्षाच्या संसारानंतर ते युद्ध लढूच नका जे तुम्ही जिंकण अशक्य आहे. पत्नी नेहमीच योग्य असते.”

हेही वाचा… १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, म्हणाली, “माझ्या आयुष्यातल्या पहिल्या…”

दरम्यान, शाहिद कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, शाहिदने ७ जुलै २०१५ रोजी मीराबरोबर लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीराच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor was cheated by two ex girlfriends who were famous women dvr