“तू आता रिटायरमेंट घे,” नेटकऱ्याच्या सल्ल्यावर शाहरुख खानचं चोख उत्तर, म्हणाला…

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे.

shahrukh

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावर अनेक जण टीका करत असतानाच दुसरीकडे शाहरुखचे चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता दर्शवत आहेत. या चित्रपटाची गाणी काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली. त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता अशातच शाहरुखने रिटायरमेंट घ्यावी अशी मागणी करणाऱ्या नेटकऱ्याला शहरुखने उत्तर दिलं आहे.

शाहरुखने ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. यात एकाने चक्क शाहरुखने रिटायरमेंट घ्यावी असं त्याला सांगितलं.

आणखी वाचा : Video: आधी हातपंप, आत थेट बैलगाडीचं चाक; ‘गदर २’ चित्रपटातील सनी देओलचा जबरदस्त लूक बघाच

या सेशनदरम्यान एका नेटकऱ्याने ट्वीट केलं, “आधीच ‘पठाण’ अत्यंत वाईट चित्रपट आहे. तू रिटायरमेंट घे.” या ट्वीटला शाहरुखनेही अत्यंत चतुराईने उत्तर दिलं. तो म्हणाला, “मोठ्यांशी असं नाही बोलत…” त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी शाहरुख खानची बाजू घेत बोललो तर कोणी त्याच्या विरोधात बोललं. आता शाहरुखचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेचा विषय ठरलं आहे.

हेही वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर १० जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 17:31 IST
Next Story
Video : मध्यरात्री एकमेकांना भेटले अरबाज खान व मलायका अरोरा, दोघांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Exit mobile version